आशाताई बच्छाव
(भिला आहेर तालुका प्रतिनिधी युवा मराठा न्युज)
देवळा प्रतिनिधी :-मेशी ता.देवळा येथील गणेशनगर परिसरात घडले बिबट्याचे दर्शन. परिसरात घबराट वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल.
येथील गणेशनगर परिसरात मंगळवारी(दि.३)रोजी दिवसभर वाजेच्या सुमारास पांडुरंग बोरसे हे दुसऱ्या शेतात कामानिमित्त गेले होते तेथून काम आटोपून सायंकाळी सात वाजेच्या सुमारास ते आपल्या राहत्या घरी आले असता त्यांनी त्यांच्या घराच्या ओट्यावर बिबट्या झोपलेल्या अवस्थेत दिसून आला बोरसे यांनी तात्काळ आजूबाजूच्या शेतकऱ्यांना बोलविले असता बिबट्या तिथेच झोपेलेला होता नागरिकांनी आरडाओरडा केला असता बिबट्या त्याठिकाणाहून न जाता डरकाळी फोडत होता . त्यानंतर काही वेळात तिथून हळूहळू जवळच असलेल्या मका शेतात बिबट्या निघून गेला त्यानंतर माजी सरपंच बापू जाधव यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून काही वेळाने वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले रात्रीची वेळ असल्याने आजूबाजूच्या शेतकऱ्यांना त्यांनी रात्रभर सुरक्षित स्थळी जाण्यास सांगून सतर्क राहण्याच्या सूचना केल्या .त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजताच वनविभागाचे जी जी पवार वनरक्षक मेशी , देविदास चौधरी वनपाल उमराणे बिट
,ईश्वर ठाकरे वनकर्मचारी, दादाजी ठाकरे वनकर्मचारी हे दाखल होत त्यांनी मक्याच्या शेतात बिबट्या असल्याच्या पाऊलखुणा बघितल्या त्यांनी दिलेल्या माहितीनुसार मादी जातीच्या बिबट्यासोबत पिलं देखील असल्याची शक्यता त्यांनी वर्तविली आहे त्यानंतर दुपारी ४ वाजता त्याठिकाणी बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला असून वनविभागामार्फत एक वनरक्षक तेथे ठेवण्यात आल्याची माहिती वनपाल देविदास चौधरी यांनी दिली आहे