
आशाताई बच्छाव
संपादकीय अग्रलेख….
बावनपैकी एकही “कुळ” नसलेला चंद्रशेखर बावनकुळे!
वाचकहो,
राजकारण म्हणजे अक्षरशः रंडीचा बाजार झाले आहे.जो तो सता आपलीच दासी म्हणून रहावी यासाठी अगदी खालच्या पातळीवर जाऊन “कमरेचे सोडून” बेताल वक्तव्ये करायला लागल्यावर,काय होणार या देशाचे हिच खरी चिंतनाची व चिंतेची बाब ठरत आहे.
काल परवा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या अक्कलेचे तारे तोडत थेट पत्रकार बांधवानाच आपल्या सोयीच्या राजकारणासाठी अत्यंत हिन शब्दात वक्तव्य केले.जर पत्रकार आपल्या विरोधात बातम्या छापत असतील तर त्यांना धाब्यावर न्या,चहा पाजा! वगैरे म्हणजे माझ्या बोलण्याचा अर्थ समजलाच असेल असे बेताल वक्तव्ये कुळच नसलेल्या बावनकुळेने करुन समस्त लेखनीची पुजा करणाऱ्या पत्रकार बांधवाचा अपमान केला आहे.कधी काळी भाजपा हा सुसंस्कृत व विचारवंत बुध्दीमानाचा पक्ष म्हणून ओळखला जायचा.पण…आजकाल या पक्षाची संपूर्ण लक्तरेच वेशीवर टांगली जात आहे.कुळच नसलेला बावनकुळे नको तेथे बावचळलेले वक्तव्य करतो.तर तोतरा सोमय्या उघडा नागडा झाला.तरी या अशा बारगळलेल्या कथित नेत्यांच्या नादात भाजपा आपली प्रतिमा जनसामन्यांमध्ये मलिन करुन घेत आहे हे काही नवीन नाही.
चंद्रशेखर बावनकुळेच्या वक्तव्याचा समाचार घेताना आम्ही फक्त एवढेच सांगू इच्छितो की,बावनकुळेंना कदाचित पत्रकार व लेखनीची ताकत माहिती नसेल या देशावर व राज्यावर जेव्हा जेव्हा सतेचे सतांतर घडते तेव्हा याच पत्रकार शक्तीचे लेखनीयुध्द अनेक सरकारे पाडते तर नवीन सरकारे बसविण्याचे कामही निर्भिडतेने कार्य करणारे पत्रकार घडवू शकतात.याची जाण बावनकुळेंनी ठेवावी.पत्रकार हा आजकाल धंदा झाला.जसे राजकारणात सुध्दा सामान्य जनतेला मुर्खात काढून स्वतःच्या सात पिढीचे कोटकल्याण करणारे भामटे आहेत.अगदी तसेच पत्रकारितेतही आहेत.पण…सगळेच एकाच माळेचे मणी नाहीत याचे भान बावचळलेल्या बावनकुळेंनी ठेवलेच पाहिजे.आजही स्वाभिमानी व निर्भिड पत्रकार हे भ्रष्ट शासनयंत्रणा व बरबटलेल्या भामटया पुढाऱ्यां विरोधात कर्तव्य निष्ठतेने आपला लेखनीधर्माचा लढा चालवून समाज प्रबोधनाचे महान कार्य करीत आहेत.याचेच भान तारतम्य नसलेल्या भाजपाच्या बुध्दीहिन प्रदेशाध्यक्षांने जरुर ठेवावेच.पत्रकारांनी जर आपला लेखनीधर्म सोडला तर हे भामटे पुढारी हा देश विकून टाकायला वेळ लागणार नाही.हे मर्मभेदक सत्य कोणताच नेता व त्याचा कथित पुढारी नाकारु शकत नाही.एव्हढेच!