आशाताई बच्छाव
चासनळी विद्यालयात डॉ कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात साजरी
दैनिक युवा मराठा
लक्ष्मण आवारे चांदवड
कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील रयत शिक्षण संस्थेचे मारुतीराव दगडूजी तिडके पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात थोर शिक्षण महर्षी, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा १३६ वा जयंती सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेची पारंपारिक ढोल लेझीमच्या तालावर मिरवणूक काढण्यात आली. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माजी मुख्याध्यापक जामदार व्ही.एन. सरपंच सुनीताताई बनसोडे, मनेषभाऊ गाडे, भास्करराव चांदगुडे, सचिनभाऊ चांदगुडे, महेशभाऊ गाडे, पवनकुमार चांदगुडे, नानासाहेब बनसोडे, प्राचार्य अशोक मांडवडे, पर्यवेक्षक ठुबे जे.एस. यांच्या हस्ते प्रतिमांचे व कर्मवीर रथाचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी गावात ठिकठिकाणी प्रतिमेला पुष्पहार घालून औक्षण करून मिरवणुकीचे स्वागत केले गेले. वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांनी व लेझीम पथक मिरवणुकीचे आकर्षण ठरले होते. यामध्ये उच्च माध्यमिक विद्यालयातील ढोल पथक व लेझीम पथक यांनी आपली कला सादर केली. विद्यालयातील सुमित पऱ्हे याने कर्मवीर भाऊराव पाटील तर कु. अंकिता चांदगुडे हिने रयत माऊली लक्ष्मीबाई पाटील यांची साकारलेली वेशभूषा सादर करून उपस्थितांची मने जिंकली. याप्रसंगी वृक्षदिंडी व ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. रांगोळी व चित्रकला प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा, क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी घोलप पी.बी. गावित एम.जे. चंदने पी.आर. मोरे आर. के.आडेप पी.व्ही. सारबंदे एन.एच. शेख आर.एन. मोमीन आय.ए.के. पारधे ए.एम. खोंडे आर.सी. राऊत एस. एल. बागुल जी. एम. शिळकंदे व्ही.ए. गोडे एस.एम. माळी एस.एल. चौधरी एच.एस. थोरात के.जी.पवार आर.बी. पेटारे ए.बी. काशिद एस.एस. सुपेकर जे.डी.डोखे एन.ए. गाडे ए. एम. कदम टी.ए. कांदळकर व्ही.ए. चांदगुडे टी.ए. बोरसे एन.डी. मंडलिक एस.टी. पवार एस. एस. कापसे के.डी.यांनी परिश्रम घेतले.