आशाताई बच्छाव
अखेर शासकीय इतमामात वीर जवान योगेश शिंदे यांना अखेरचा निरोप
योगेश शिंदे चे अपघाती निधनाने खडक माळेगाव व वनसगाव पंचक्रोशीवर शोककळा
दैनिक युवा मराठा
रामभाऊ आवारे निफाड
खडक माळेगाव तालुका निफाड येथील भारतीय सैन्य दलात ११ वर्षापासून देशसेवा करत असलेला योगेश सुकदेव शिंदे ,वय ३१ वर्ष , राज्यस्थान येथील जोधपूर येथे ३३ मेडीयम चे भारतीय सैन्य दलातील जवान काही दिवसांसाठी आपल्या खडक माळेगाव गावी सुट्टीवर आलेला असताना काल वनसगाव येथे पिक अप ने जोरदार धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला. आज सर्व शासकीय सोपस्कार पूर्ण करत खडक माळेगाव येथे शासकीय इतमामात हजारोंच्या संख्येने उपस्थित शोकाकूल नागरिकांच्या उपस्थितीत साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला.
भारतीय सैन्य दलातील खडक माळेगाव तालुका निफाड येथील जवान राजस्थान येथे देशसेवा करत होता. आपल्या गावी सुट्टीवर आलेला असताना काल वनसगाव निफाड रोडने वनसगाव कडे येत असताना आपल्या मित्राच्या वस्तीकडे वळण्याचा प्रयत्न करत असताना समोरून येणाऱ्या पिक अप ने जोरदार धडक दिल्याने जागेवरच मृत्यू झाला होता.अत्यंत वाईट घटना समजताच तात्काळ योगेश शिंदे यास देवळाली अर्टीलरी सेंटरमध्ये (मिलिटरी) घेऊन गेले. आज सर्व शासकीय सोपस्कार पूर्ण करत त्याची पार्थिव खडक माळेगाव तालुका निफाड येथील आपल्या घरी सर्व सैन्य दलातील बटालियन जवानांच्या उपस्थितीत आणण्यात आले होते.
भारतीय सैन्यदानातील जवानांनी आपली गाडी फुलांनी सजवून त्यावर तिरंगा ध्वज लावत पार्थिव देवळाली आर्टिलरी सेंटरच्या वाहनामध्ये ठेवत वीर जवान अमर रहे! वंदे मातरम !ए मेरे वतन के लोगो! योगेश शिंदे अमर रहे !! या घोषवाक्याने खडक माळेगाव, वनसगाव, सारोळे खुर्द, खानगाव, कोटमगाव,नैताळे,देवरगाव, लासलगाव, दरसवाडी,टाकळी,थेटाळे, आदी गावांसह पंचक्रोशीतून आलेल्या सर्व शोकाकुल सगे सोयरे, नातेवाईक, मित्रपरिवार , ग्रामस्थांनी आपल्या हातांनी पुष्प वहात विनम्र भावाने श्रद्धांजली वहिली. योगेश शिंदे यांच्या घरापासून पार्थिव देह खडक माळेगाव जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणामध्ये अत्यंत शोकाकुल वातावरणात हजारोंच्या उपस्थितीत आला. यावेळी योगेशचे आई-वडील, मोठे बंधू श्री हरी, भावजय ,पत्नी यांनी हंबरडा फोडत श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी योगेशच्या लहान मुलांनी आपल्या वडिलांना अंतिम समयी अग्नीडाग दिला व योगेश शिंदे यांच्या मोठ्या भावाने श्रीहरी यांनी पाणी दिले. यावेळी देवळाली आर्टिलरी सेंटरचे छत्री साहेब, सुभेदार ,जवान तसेच जोधपुर येथील ३३ मिडीयम जवान तसेच लासलगाव पोलीस ठाण्याच्या वतीने मानवंदना देण्यात आली.
वीर जवान योगेश शिंदे यांच्या अंत्यसंस्काराला सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, अध्यात्मिक, सांस्कृतिक, अधिक क्षेत्रातील मान्यवर तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी अनेक गावचे सरपंच ,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पत्रकार बंधू, सेवानिवृत्त भारतीय सैन्य दलातील जवान तसेच सर्व भारतीय सैन्य दलातील फौज फाटा मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी कॅबिनेट मंत्री छगनरावजी भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे ,ना डॉ भारती पवार यांचे स्वीय सहाय्यक डॉ उमेश काळे ,निफाड चे तहसीलदार शरद घोरपडे ,निफाड चे उपनगराध्यक्ष अनिल कुंदे, शाहू माणिकराव शिंदे येवला, जि प सदस्य डि के नाना जगताप, राष्ट्रवादीचे बबनराव शिंदे, निफाड पंचायत समितीचे शिवा पाटील सुराशे ,लासलगाव बाजार समिती संचालक राजेंद्र बोरगुडे, संदीप गारे, धनंजय डुंबरे, ह भ प निवृत्ती महाराज रायते ,वनसगाव विद्यालयाचे प्राचार्य सी डी रोटे,दिपक गायकवाड सर, खडक माळेगावचे सरपंच देविदास पवार , जाणता राजा मित्र मंडळाचे अध्यक्ष विकास रायते, योगेश रायते, सामाजिक कार्यकर्ते दत्ता रायते, विश्वगामी पत्रकार संघटनेचे कैलास उपाध्ये आदींसह पंचक्रोशीतील अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली.