राजेंद्र पाटील राऊत
संपादकीय अग्रलेख….
व-हाणे प्रकरणात वेंदेची (अ) कर्तबगारी भाग – ४
सरपंचाला गोत्यात आणण्यासाठीच कटकारस्थान!
वाचकहो,
लोकशाहीत ग्रामसभा म्हणजे नागरिकांना मिळालेला सगळ्यात मोठा हक्क व अधिकार असून,ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेला संसदेत पारित होणारे ठराव व निर्णयासारखेच अनन्यसाधारण महत्त्व असून,पण…अजूनही ग्रामसभा बाबत उदासिनता दिसून येते.ग्रामसभेला पोरकटपणा समजून आणि लोकशाहीला अक्षरशः पायदळी तुडवून जेव्हा काही कपाळकरंटे ग्रामसभा उधळून लावण्याचे षडयंत्र रचून कटकारस्थान करतात तेव्हा खरे अर्थाने लोकशाहीचे वस्त्रहरण होत असल्याचे उघडया डोळ्यांनी बघावे लागते यापेक्षा भयानक दुर्दैव ते कोणते असेल?
व-हाणे,ता.मालेगांव ग्रामपंचायतीने आयोजीत केलेल्या ४ आँक्टोबर २०२१ च्या नियोजीत ग्रामसभेला हजर असलेल्या सदस्यांनी प्रोसिंडीग बुकात सहया करु नयेत,म्हणजे हि ग्रामसभा उधळून लावण्या बरोबरच सरपंचाला गोत्यात आणण्यासाठीच हि खेळी सहया न करणाऱ्या सदस्यांनी कटकारस्थान रचून खेळल्याचा निष्कर्ष व अनुमान काढण्यास पुरेसा वाव मिळतो आहे.ज्या ग्रामस्थांनी आपल्या वाँर्डाचा विकास होईल म्हणून मोठया अपेक्षेने निवडून दिलेले सदस्यच जेव्हा ग्रामसभेला हजर राहूनही फक्त मतभेदा पोटी ग्रामसभेचा मुळ दस्त व गाभा असलेल्या इतिवृत बुकात सहया करत नाहीत.तेव्हा या दिवटयांना गावाच्या विकासाशी काही देणे घेणे नसते.फक्त आणि फक्त स्वतःच्या फायद्यासाठी विविध कामातून मिळणाऱ्या टक्केवारीवर डोळा ठेऊन ग्रामसभा व लोकशाहीचा अक्षरशः पालापाचोळा करुन बट्ट्याबोळ करण्याचा सपाटा या नतद्रष्टांनी चालविला आहे.शासनाच्या १२ आँगस्ट २०१४ च्या अध्यादेश परिपत्रकानुसार ग्रामसभा उधळणा-यांवर कडक कारवाईचे संकेत दिलेले असतानाही गटविकास अधिकारी वेंदे या प्रकाराकडे कोणत्या उद्देशाने डोळेझाक करुन व-हाणे प्रकरणात झाकाझाकी करीत आहेत.हे एकदा त्यांनी स्पष्ट केलेच पाहिजे.व-हाणेतील सरपंचपद धोक्यात कसे येईल,सरपंचाला गोत्यात आणून सहया न करण्याचे कटकारस्थान रचणा-यांनी ग्रामसेविका सुवर्णा सांळुखेच्या संगनमताने गणपूर्ती पुर्ण नसतानाही ग्रामसभेला सुरुवात करुन खोटे -नाटे ठराव या ग्रामसभेवर पारित करुन घेण्याचे षडयंत्र रचले.म्हणजे एकंदरीत लोकशाहीची आमच्या समोर कवडीचीही किंमत नाही.आम्ही मनमानी करुन “हम करे सो कायदा” या पध्दतीने शासनाची दिशाभूल करुन फसवणूक करण्याबरोबरच व-हाणेतील सरपंचाच्या अस्तित्वालाच धोका निर्माण करणाऱ्या या समाजविघातक प्रवृतीविरुध्द कायद्याने कठोरात कठोर कारवाईचा प्रस्ताव आता गटविकास अधिकारी वेंदेनी वरिष्ठांना पाठवून आपल्या पदाची इभ्रत व अब्रू राखावी एव्हढीच माफक अपेक्षा!