आशाताई बच्छाव
तेल्हारा येथील दुचाकी चोरट्यास खामगावात पकडले – तीन दुचाकी जप्त!
खामगाव शहर पो.स्टे.च्या गुन्हे शोध पथकाची कारवाई.
विशेष प्रतिनिधी
ज्ञानेश्वर पाटील दांदळे
खामगाव – शहर पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने तेल्हारा येथील एका अट्टल दुचाकी चोरट्यास पकडले असून त्याच्या जवळुन तीन चोरीच्या दुचाक्या जप्त करण्यात आल्या असून दुजाकी चोरांचे प्रकरण वाढतचं चालले असून शहरातून मागील काही दिवसात अनेक दुचाकी चोरीस गेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क झालेली असून शहर पोलीस स्टेशनचे डीबी पथकाचे दिनांक १ जुलै रोजी सपोनी संदीप गोंडाने, व पोना सागर भगत,पोना प्रदीप मोठे, पोकाॕ रवींद्र कन्नर,पोकाॕ गणेश कोल्हे, पोकाॕ राम धामोडे,पोकाॕ अमर ठाकूर, पोकाॕ राहुल थारकर,पोकाॕ अंकुश गुरुदेव, पोकाॕ आशिषसिंह ठाकुर, असे पोस्टे हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की एक इसम बाळापुर नाका येथे हजर असून त्यांनी एक पल्सर व दोन होंडा शाईन तीन मोटरसायकल विक्रीकरिता आणलेल्या आहेत सदर मोटरसायकल चोरीच्या असल्याची शक्यता आहे अशा खबरे प्रमाणे संशयित इसम नामे अजय शालीकराम अडणे वय 32 वर्ष राहणार भोईपुरा तेल्हारा यास ताब्यात घेऊन त्याचे ताब्यातील बजाज पल्सर क्रमांक एम एच 28 ए व्ही 2416, होंडा शाईन एम एच 28 एटी 5707, होंडा शाइन चेचीस क्रमांक ME4JC653GG7072399 तिन्ही मोटरसायकल बाबत संशयित आरोपी अजय शालिकराम अडणे राहणार भोईपुरा तेल्हारा याने कोणतीही समाधानकारक उत्तर न दिल्याने त्याचे विरुद्ध कलम 124 मपोका प्रमाणे कारवाई करण्यात आली व तपासा दरम्यान सदर मोटार सायकल अजय शालिकराम अडाने वय 32 वर्ष राहणार भोईपुरा तेल्हारा यांनी शेगाव येथून चोरी केल्याचे निष्पन्न झाले असून पोस्टे शेगाव शहर येथे मोटार सायकल चोरीबाबत अप.नंबर 325/2023 कलम 379 भादवी प्रमाणे गुन्हा नोंद असल्याने पुढील कारवाई कामी ताब्यात घेतलेल्या आरोपीस पोस्टे शेगाव शहर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे अशाप्रकारे खामगाव शहर पोस्टेच्या डीबी पथकाकडून मोठ्या शिताफीने तीन मोटरसायकल जप्त करून आरोपीस पकडण्यात यश आले. सदरची कारवाई बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अशोक थोरात अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव, विनोद ठाकरे उपविभागीय पोलीस अधिकारी खामगाव, यांचे मार्गदर्शनात व खामगाव शहर चे पोलीस निरीक्षक शांतीकुमार पाटील यांचे मार्गदर्शनात गुन्हेशोध पथकाने कारवाई केली आहे.