आशाताई बच्छाव
ठेंगोडयाची जिल्हा परीषद शाळा धोखेदायक ठेंगोडा,(हरिकृष्ण भास्कर प्रतिनिधी)-ठेंगोडा ता.सटाणा गावातील जिल्हा परीषदेची शाळा धोखेदायक बनली असून त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतण्याची दाट शक्यता निर्माण झाली आता पावसाळ्याच्या पुर्वसंध्येलाच या शाळेचे पत्रे फुटलेले असल्याने वर्गात पावसाचे पाणी येणार अशी भीती शाळेच्या शिक्षकाना वाटु लागली आहे. वारंवार प्रशासनाकडे मागणी करून सुध्दा प्रशासन दुर्लक्ष करत आहे. गावातील ग्राम पंचायतीकड़े देखील सुचना देऊनही दुर्लक्षच झाले आहे. फक्त शाळेत येऊन शाळेचे निरीक्षण करून व खोटे आश्वासन देवुन निगुन जायाचे ्अशा पध्दतीने 2021 ते 2022 पर्यंत कामाचे प्रस्ताव मांडले गेले आहे तरी आजपर्यंत शाळेची दुरुस्ती होत नाही आज रोजी शाळेतील मुलाचे पालक शाळेची दुर्दशा पाहुन पालकानाही भिती वाटु लागली मुलानी वर्गात शिकाव की जीव सांभाळावा अशी परिस्थिती आज ह्या शाळेची झाली आहे शासनाने लवकरात लवकर ह्या शाळेची दखल घ्यावी व मुलाना काही जीवीत हानी झाल्यास प्रशासन जबाबदार राहील अशी गावातील पालकाची तक्रार आहे.