
आशाताई बच्छाव
देगलूर येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय स्थापन करा
देगलूर प्रतिनिधी, गजानन शिंदे, युवा मराठा नुज नेटवर्क
देगलूर हा उपजिल्हा असुन देगलूर येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय स्थापन करणे खुप गरजेचे असुन देगलूर ला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय स्थापन करण्यासाठी देगलूर अभिवक्ता संघ व पुरोगामी अभिववक्ता संघ यांनी गेल्या विस वर्षांपासून शासन दरबारी व संबंधित न्याय व विधी विभागाकडे अनेकदा निवेदनाद्वारे मागणी केली असुन आज पर्यंत या मागणीचे कोणी दखल घेतली नाही,
देगलूर तालुक्यांतील ग्रामीण भागातील जनतेला जिल्हा व सत्र न्यायालयीन कामासाठी बिलोली येथे जावे लागत आहे येण्या जाण्याचा शारिरीक व मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे वयोवृद्ध व महिला पक्षकारांना सदर धावपळीमुळे हाल होत आहेत..
याबाबत देगलूर अभिवक्ता संघ व पुरोगामी अभिववक्ता संघ यांनी अनेक निवेदने देऊन सुध्दा देगलूर येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय स्थापित करण्यात आले नाही, देगलूर तालुक्यांतील लोकांना हल्ली जिल्हा न्यायालयातील कामासाठी बिलोली येथे जावे लागते व देगलूर तालुक्यातील ग्रामीण भागापासून बिलोली हा 80 कि मी चा अंतर आहे व तेथुन त्यांच्या गावी जाण्यासाठी दळणवळणाची कोणतीच सुविधा उपलब्ध नाही तसेच काही गावांतील लोकांना तर अतिरिक्त जिल्हा न्यायालय बिलोरी येथे पेशींच्या तारखेला न्यायालयात वेळेवर हजर राहण्यासाठी त्यांच्या गावापासून 1ते2 कि.मी पायी येवून ॲटो ने देगलूर येथे येवून परत गावी जाणे शक्य नाही
कारण बिलोलीहुन देगलुरला येण्याकरीता पाहिजे तसे दळणवळणाची सोय नाही त्यामुळे पक्षकारांना देगलूर् किंवा बिलोली येथे संध्याकाळी मुक्कामी रहावे लागत आहे व एखादी महिला पक्षकारास बिलोली येथे एकटे जाणे शक्य राहीले नाही व सध्या सुरू असलेल्या अतिरिक्त जिल्हा न्यायालय बिलोली येथे देगलूर तालुक्यांतील प्रकरणाची संख्या निम्मापेक्षा जास्त असल्याने व स्वतंत्रता काळापासून देगलूर उपजिल्हाच्या ठिकाणी असल्याने देगलूर येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय स्थापन करण्यासाठी मा खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या कडे निवेदनाद्वारे मागणी करतेवेळी देगलूर शिवसेना शहर सचिव धनाजी जोशी…