
आशाताई बच्छाव
येवते पाटील विवाह सोहळ्याला अनेक मान्यवरांची उपस्थिती
नांदेड जिल्हा प्रतिनिधी मनोज बिरादार
सद्याला मे महिना चालू असुन सर्वत्र लग्न समारंभाचा धुमधडाका सुरू आहे. तर दुसरीकडे मात्र नेते मंडळी लग्न समारंभाला उपस्थित राहुन वधु वरांना शुभ आशिर्वाद देण्यात मग्न आहेत. अशाच एका येवती येथील पत्रकार विठ्ठल पाटील यांच्या पुतण्याच्या म्हणजे येवते पाटील व गव्हाणे पाटील परिवार यांच्या विवाह सोहळ्याला तालुक्यातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली असून यावेळी मुखेडचे सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ.व्यंकटेश भोसले, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव माधव अण्णा साठे, बहुजन चळवळीचे नेते तथा शिवसेना (ठाकरे गट) जिल्हा समन्वयक दशरथराव लोहबंदे , शिवसेना (ठाकरे गट) अल्पसंख्याक आघाडी जिल्हाप्रमुख जैनोदीन पटेल,मुखेड पं.स. सेवानिवृत्त सहाय्यक गटविकास अधिकारी शंकर पाटील येवते, पोलीस जमादार व्यंकटराव जाधव , येवतीचे युवा सरपंच डॉ.उमेश पाटील, माजी सरपंच विजयकुमार पाटील, माजी सरपंच निळकंठराव सुभेदार, काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते शेख मैनोदीन, पोलीस पाटील शामराव नागरगोजे, येवतीचे युवा उद्योजक पद्माकर पाटील येवतीकर, कृषी उत्पन्न बाजार समिती तज्ञ संचालक देविदास सुडके, माजी उपसरपंच नरहरी पाटील नागरगोजे, पंढरी पाटील गोपनर , शेख अलिम साहेब, जेष्ठ पत्रकार तथा जिजाऊ ज्ञान मंदिर शाळेचे संचालक ज्ञानोबा जोगदंड सर, श्री सद्गुरू नराशाम महाराज इंग्लिश स्कूल चे संचालक आनंदराव राठोड सर , दै.चालू वार्ताचे ता. प्रतिनिधी शिवकुमार बिरादार, तरुण भारतचे ता.प्रतिनिधी संजय कांबळे, गाव माझा न्युजचे ता.प्रतिनिधी बाबुराव वाघमारे, आदी मान्यवर उपस्थित होते येवते पाटील व गव्हाणे पाटील या दोन्ही परिवारातर्फे उपस्थित मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला असून या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन शिवव्याख्याते संजय गुरुजी बिचकुंदे यांनी केले आहे.तर आभार प्रदर्शन पत्रकार विठ्ठल पाटील यांनी मांडले आहे .