Home नांदेड बारावीचा निकाल जाहीर कै.विश्वनाथराव नळगे उ.मा.विद्यालयात कला शाखेतून प्रिया नारायणकर प्रथम

बारावीचा निकाल जाहीर कै.विश्वनाथराव नळगे उ.मा.विद्यालयात कला शाखेतून प्रिया नारायणकर प्रथम

172
0

आशाताई बच्छाव

IMG-20230525-WA0081.jpg

बारावीचा निकाल जाहीर
कै.विश्वनाथराव नळगे उ.मा.विद्यालयात कला शाखेतून प्रिया नारायणकर प्रथम
लोहा,(प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ लातूर बोर्डाचा निकाल जाहीर झाला असून लोह्यातील कै. विश्वनाथराव नळगे उच्च माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी कु.प्रिया राजकुमार नारायणकर ही कला शाखेतून 79.50 टक्के गुण घेऊन प्रथम आली आहे तर वर्षा पिराजी ढिकले हिने 77.83% गुण प्राप्त केले असून द्वितीय क्रमांक पटकावला आहे तर श्रद्धा सायना देवके हिने 73.33% गुण घेऊन विद्यालयातून तृतीय क्रमांक पटकाविला आहे.
शहरातील कै विश्वनाथराव नळगे उच्च माध्यमिक विद्यालयाने आपली यशाची परंपरा कायम राखत आज दि.(25) रोजी निकाल लागलेल्या विद्यार्थ्यांमध्ये प्रथम श्रेणीत दहा विद्यार्थी, श्रेणीत 19 विद्यार्थी, तृतीय श्रेणीत दोन विद्यार्थी असे एकूण 31 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एकूण निकाल 91.17 टक्के लागला आहे.
यशाचे श्रेय त्यांनी मुख्याध्यापक विलास नागेश्वर, संस्थेचे अध्यक्ष केरबा सावकार बिडवई, व प्राध्यापक वृंद यांना व आई वडिलांना दिले आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here