
आशाताई बच्छाव
मालेगांवी राज्य जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचा एल्गार.. १४ मार्चपासून जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी संपावर जाण्याचा निर्धार! मालेगांव,(राजेंद्र पाटील राऊत युवा मराठा न्युज नेटवर्क)- संपूर्ण महाराष्ट्रभरातील राज्य सरकारी कर्मचारी व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ तात्काळ मंजूर करावा, या व अशाच विविध मागण्यासाठी संपावर जाण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनानी जाहिर केला आहे. आज मालेगांव पंचायत समिती येथे महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या वतीने व त्यासोबतच जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेच्या पदाधिका-यांनी निवेदन सादर केले असून, त्यात आपल्या जुन्या पेन्शन योजनेसह विविध हक्काच्या मागण्यांसाठी १४ मार्च २०२३ पासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे.यावेळी टि.एम.बच्छाव ग्रामसेवक संघटना तालुकाध्यक्ष,सुनील पवार,अशोक शेवाळे,बी.एन.पगार,बापू सोनवणे,दिनेश जाधव,श्रीमती मनिषा शेवाळे,ग्रामसेविका अहिरे,विस्तारधिकारी राजबन्शी,दिपक शेलार,निलेश पाटील,ज्ञानेश्वर मोतीराम पवार,अशोक बी वाघ यांचेसह असंख्य कर्मचारी उपस्थित होते.प्रचंड घोषणाबाजी करीत पेन्शन योजना संपाबाबतची वातावरण निर्मिती यावेळी करण्यात आली,याप्रसंगी ज्ञानेश्वर मोतीराम पवार यांनी आपल्या आंदोलनाची व भुमिका कर्मचाऱ्यांना विषद केली.