आशाताई बच्छाव
नगरपालिकेच्या हलगर्जी पणाचा नागरिकांना निष्कारण त्रास सोसावा लागतो- तालुकाप्रमुख संजय दशरथ घोडके.
माढा प्रतिनिधी ज्ञानेश्वर निकम (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
जन्म व मृत्यूची नोंद नगरपालिका दप्तरी करणे प्रत्येक नागरिकांना बंधन कारक आहे व प्रत्येक नागरिक जन्म मृत्यूची नोंद नगरपालिका दप्तरी करीत असतात परंतु जन्म दाखला घेते वेळी जर ती नोंद 25 ते 30 वर्षाचे असेल तर नगरपालिका दप्तर यांची नोंद उपलब्ध नसते व तसे नगरपालिका प्रशासन नोंद नसते बाबत दाखला देतात व न्यायालयाचा आदेश आणण्यास सांगितले जाते. न्यायालयाच्या आदेश आणण्यासाठी वकिलाची गरज लागते सुमारे पाच ते सात हजार रुपये खर्चही येतो व सुमारे एक महिन्याच्या कालावधीत त्यासाठी लागतो. नगरपालिका च्या हलगर्जी पणाचा हा त्रास नागरिकांना निष्कारणच सोसावा लागत आहे ज्याच्या नोंदी सापडत नाहीत त्यांना न्यायालयाच्या आदेश व्यक्तिरिक्त शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र देऊन दाखला देण्यास काय हरकत आहे. त्यामुळे वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार आहे व नागरिकांचा त्रास कमी होणार आहे, नगरपालिका प्रशासनाकडे या गोष्टीकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन निष्कारण कोणाला त्रास कमी करावा अन्यथा त्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पंढरपूर शहर तालुक्याच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा लेखी निवेदनाद्वारे पंढरपूर नगरपालिका प्रशासनात देण्यात आला नगरपालिकेचे उपमुख्यअधिकारी मा. सुनीलजी वाळुंजकर साहेब यांनी हे लेखी दिलेले निवेदन स्वीकारले. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे पंढरपूर तालुकाप्रमुख संजय दशरथ घोडके, ज्येष्ठ शिवसैनिक काकासाहेब बाबुराव बुराडे, उप शहर प्रमुख लंकेश काकासाहेब बुराडे, शिवसेना पंढरपूर कार्या अध्यक्ष अनिल कसबे, उप शहर प्रमुख ईश्वर साळुंखे, कैलास नवले शाखाप्रमुख पिंटू रेड्डी, शाखाप्रमुख प्रणित पवार शाखाप्रमुख विजय गगणे, शाखाप्रमुख विजय जाधव, उपशाखाप्रमुख किरण शिकलकर, माजी उप शहर प्रमुख गजानन टल्लू, युवा सेना पंढरपूर शहर समव्यक्त अमित( पिंटू) गायकवाड, शुभम यादव, गुरु अष्टेकर आदी पदाधिकारी व शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.