आशाताई बच्छाव
पुणे,(प्रतिनिधी उमेश पाटील)– 66 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन दापोडीत बुद्ध विहारामध्ये नागरिकांनी मेणबत्ती लावून धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहा साजरा केला यावेळी दापोडी मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास माजी नगरसेवक पिंपरी चिंचवड मनपा संजय काटे यांच्या हस्ते प्रथम पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर खीर व शरबत वाटण्याचा कार्यक्रम करण्यात आला यानंतर बुद्ध विहारांमध्ये जाऊन भगवान गौतम बुद्ध समोर मेणबत्ती लावण्यात आली यावेळी धम्मचारी यशो सागर यांचे प्रवचन झाले यावेळी त्यांनी बोलताना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मानवाच्या कल्याण करण्यासाठी मानवाच्या हितासाठी लाखो अन्वय सह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि धम्मचक्र गतिमान करण्यास सुरुवात केली असे मनोगत त्यांनी व्यक्त केले यावेळी यश सागर राहुल कांबळे फिलिप पठारे धम्मचारीनी यशो तम्मा संतोष काटे सद्गुरु काटे अमित काटे सरस्वती अनाथ आश्रम दापोडी तील मुले लक्ष्मीकांत बाराते निखिल मते अमर खंडागळे कालीचरण पाटोळे धर्मराज कांबळे आदींच्या हस्ते मेणबत्ती लावण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मीकांत बाराते यांनी केले तर आभार विजय शिंदे मानले