आशाताई बच्छाव
संग्रामपूर तालुका ग्राम रोजगार सेवक संघटनेचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाची सांगता!
ज्ञानेश्वर पाटील दांदळे विशेष प्रतिनिधी
(युवा मराठा न्यूज नेटवर्क)
संग्रामपूर:- आज दिनांक 3 ऑक्टोंबर रोजी पंचायत समिती संग्रामपूर समोर विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. त्याची सांगता झाली असून सदर उपोषणाला सकाळपासूनच जवळपास सर्वच राजकीय पक्षांच्या मंडळींनी भेटी दिल्या तसेच सरपंच संघटना आणि ग्रामसेवक संघटना यांनी उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला तसेच सर्व पक्षाचे राजकीय पुढारी यांनीही भेटी दिल्या त्यामध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने, उपतालुक्का प्रमुख विजय मारोडे, उपतालुकाप्रमुख कैलास पाटील कडाळे, किसान सेनेचे तालुकाप्रमुख अमोल पाटील ठाकरे व इतर शिवसैनिक आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार डॉ संजय कुटे यांचे भाऊ बाळूभाऊ कुटे, सहकार आघाडी जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील ठाकरे, अंबादास चव्हाण, रणजीत सिंग डाबेराव तसेच भाजपाचे इतर पदाधिकारी व वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा परिषद सदस्य राजीव पवार, श्रीराम बांगर, वसूलकर, राहुल उमाळे, व इतर पदाधिकारी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष विजय ठाकरे व त्यांचे पदाधिकारी व राष्ट्रवादी काँग्रेसचे अमित भोंगळ, सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रकाश अरबट, सोपान पाटील, पप्पू पाटील व इतर सर्व सरपंच संघटनेचे पदाधिकारी ग्रामसेवक संघटनेचे सुभाष दुबे आणि सर्व पदाधिकारी तसेच इतरही पक्षांच्या पदाधिकारी यांनी भेट घेऊन पाठिंबा दिला त्यानंतर पंचायत समिती संग्रामपूर येथील गटविकास अधिकारी एस एम पाटील यांनी सहाय्यक गट विकास अधिकारी भिलावेकर व तायडे यांच्यामार्फत लेखी पत्र देऊन वरिष्ठांकडे माहिती पाठवली असे सांगून उपोषणाची सांगता झाली.
तसेच पत्रकार संघटनेचे सर्व पत्रकार बांधव दिवसभर उपस्थित राहून त्यांनी पण या उपोषणाला सर्व मदत केली त्यावेळी सर्व तालुक्यातील ग्रामरोजगार सेवक उपस्थित होते त्यासाठी तालुका अध्यक्ष राहुल मेटांगे यांनी सर्व पत्रकार बांधवांचे आभार मानले.