
आशाताई बच्छाव
पुणे, हवेली तालुका प्रतिनिधी श्री संजय वाघमारे: औरंगाबादच्या पोलीस आयुक्त कार्यासमोर एका महिलेने पेटवून घेतले! औरंगाबादच्या पोलीस आयुक्त कार्यासमोर सविता काळे या महिलेने पेटवून घेतले. त्यामध्ये ती ६०% भाजली असल्याने तिचा सरकारी दवाखान्यामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. या पाठीमागचे कारण सांगितले जाते की, तिच्या घराजवळील शेजारी दांपत्य तिला मानसिक त्रास देत होते व त्यांना वारंवार सांगूनही तो त्रास वाढत चालला होता. रोजच्या या त्रासाला ती कंटाळली होती. त्यामुळे तिने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली .ही तक्रार करूनही पोलीस दल दलाने सहकार्य केले नाही असे तिच्या कुटुंबीयांना सांगितले. त्यामुळे त्या महिलेने हे शेवटचे टोकाचे पाऊल उचलले. पोलीस आयुक्तालया समोर स्वतःला पेटवून घेतले. त्यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितले की सदर झालेली घटना लक्षात घेता तिच्या मृत्यू झाला जे कोणी जबाबदार असतील, त्यांची चौकशी केली जाईल. पुढील कारवाई त्यानुसार होईल असे यांनी सांगितले.