आशाताई बच्छाव
कुंभार्ली महात्मा गांधी तंटामुक्त अध्यक्षपदी प्रसाद गोविंद कोलगे यांची बिनविरोध निवड रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ)
कुंभार्ली ग्रामपंचायतीच्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी युवा कार्यकर्ते प्रसाद कोलगे यांची एकमताने निवड करण्यात आली.
दि. २३ ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत सन २०२२-२३ या कार्यकालासाठी कुंभार्ली ग्रामस्थांनी बिनविरोध निवड केली. पूर्व विभागातील कुशल युवा नेतृत्व म्हणुन प्रसाद कोलगे यांची ओळख असून गेली अनेक वर्षे युवक, कामगार, व ग्रामस्थांचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने योगदान देत आहेत. त्यांच्या निवडीबद्दल कुंभार्लीचे सरपंच श्री रवींद्र सकपाळ उपसरपंच श्री.संदिपशेठ कोलगे , राजाभाऊ नारकर , माजी तंटामुक्ती अध्यक्ष विलास मोहिते ,योगेश शिंदे , दिनेश लब्धे , प्रशांत कोलगे , निखिल सांगळे , बाळू जाधव , गणेश जाधव , शार्दुल बाईत, राहुल पाष्टे , मारुती लांबे, संकेत भंडारे , अनिल मोहिते , आकाश कोलगे, सर्व ग्रा. पं. सदस्य आणि ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.