आशाताई बच्छाव
मा.कॅबिनेट मंत्री डॉ.संजय कुटे यांच्या जळगाव जामोद मतदार संघातील ७० कोटी विकास कामाचा आराखडा
युवा मराठा वेब न्यूज पोर्टल प्रतिनिधी रवींद्र शिरस्कार संग्रामपूर
सध्या राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू असून राज्य सरकारने मांडलेल्या पुरवणी मागन्यात जळगाव जामोद मतदारसंघासाठी 70 कोटी एवढ्या मोठ्या निधीच्या रस्ते व पूल बांधकाम या विकास कामांसाठी निधी खेचून आणला. मतदार संघातील रस्त्यांचे जाळे विणण्याचे काम नियोजन पूर्वक डॉ कुटे करीत आहेत. याचाच भाग म्हणून या 70 कोटींच्या विकास निधीतून लोकांच्या मागणी नुसार व कामाच्या आवश्यकतेनुसार त्यांनी कामे घेतली आहेत. त्यामुळे जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
या निधीतून संग्रामपूर व जळगाव जामोद तालुक्यातील 6 रस्त्यांची व 8 पुलांची कामे होणार असून त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला दळण वळण करणे सोईचे होणार आहे. यामध्ये खालील विकास कामे मार्गी लागणार आहेत.
रा.मा.क्र 269 वर टूनकी ते शेगाव ते पळशी अडगाव रस्त्यावर किमी 5/00 ते 7/00 मधील लांबीची सुधारणा करणे 3 कोटी रुपये, रा.मा. 269 वर किमी 2/900 मध्ये लहान पुलाचे बांधकाम करणे 1 कोटी रुपये, रा.मा. 269 वर किमी 4/600 मध्ये लहान पुलाचे बांधकाम करणे 75 लक्ष रु, रा.मा. क्रमांक 47 वर सोनाळा गावातील 86/00 ते 98/00 व 110/500 ते 112/00 या रस्त्याची सुधारणा करणे 15 कोटी रु, सावरगाव माऊली फाटा ते माऊली भोटा पुलापर्यंत किमी 4/00 ते 7/500 या लांबीची सुधारणा करणे 4 कोटी रुपये, प्रजीमा 4 रस्त्यावर किमी 6/00 ते 8/00 मध्ये रस्त्याची सुधारणा करणे 2.5 कोटी रु, प्रजीमा 65 वर वसाडी ते जुने भोन या रस्त्यावर 6/100 ते 8/200 या लांबीची सुधारणा करणे 2.5 कोटी, प्रजीमा 69-रामा 47 वर किमी 13/600 मध्ये पूल बांधकाम करणे 1.5 कोटी, प्रजीमा क्रमांक 62 -रा.मा. 271 जळगाव जामोद मडाखेड चोंढी कळमखेड जस्तगाव ते रामा 269 ला जोडनाऱ्या मार्गावर 15/900 मध्ये मोठ्या पुलाचे बांधकाम करणे 10 कोटी रुपये, प्रजीमा 4 रस्त्यावर किमी 8/200मध्ये लहान पुलाचे बांधकाम करणे 2.5 कोटी, याच रस्त्यावर किमी 10/400 मध्ये पूल बांधकाम करणे 2 कोटी, वसाडी ते जुने भोन या मार्गावर किमी 6/00 मध्ये लहान पुलाचे बांधकाम करणे 1.5 कोटी रू, प्रजीमा 65 वर वसाडी ते जुने भोन या रस्त्यावर 5/600 मध्ये लहान पुलाचे बांधकाम करणे 1.5 कोटी, प्रजीमा 62 वर -रा.मा. क्र. 271 जळगाव जामोद चोंढी जस्तगाव ते रा.मा. क्र. 259 ला जोडणारा मार्ग 14/00 ते 24/00 मध्ये रस्त्याची सुधारणा करणे 20 कोटी रुपये अश्या अत्यंत महत्वाच्या कामांचा समावेश आहे.
याबद्दल अनेक कार्यकर्ते तसेच जळगाव जामोद मतदार संघात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून आ. डॉ. संजय कुटे यांचे आभार व्यक्त होत आहेत.