आशाताई बच्छाव
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या रत्नागिरीच्या जिल्हाध्यक्षपदी शरद मोरे रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार शरद मोरे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीने ग्रामीण पत्रकारांच्या प्रश्नांना न्याय मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटना अमरावती जिल्हयात २५वर्षापूर्वी स्थापन झाली असून दव्युत्तर तिचे कार्य महाराष्ट्रसह देशातील चार राज्यात सुरू आहे. संघाचे केंद्रीय अध्यक्ष मनोहर सूने, उपाध्यक्ष राजेंद्र भुरे, प्रदेशाध्यक्ष कैलासबापू देशमुख, प्रदेश उपाध्यक्ष मुनीर खान यांनी रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी शरद मोरे यांची निवड केली आहे. गेली ३० वर्ष पत्रकारिता यापिका मनोज वर्षाव क्षेत्रात असलेल्या शरद मोरे यांनी ग्रामीण वार्ताहर म्हणून आपली कारकिर्द सुरू करून त्यांनी विविध दैनिकात जिल्हा प्रतिनिधी, उपसंपादक, निवासी संपादक, कार्यकारी संपादक म्हणून काम केल्यानंतर लांजा- राजापूर वृत्त आणि कोकण सहकार या दोन साप्ताहिक वृत्तपत्राचे समूह संपादक असून राजापूर तालुक्यातील ग्रामीण भागातून प्रकाशित करीत आहेत. यामुळे ग्रामीण भागातील पत्रकारांना येणाऱ्या अडचणीची त्यांना जाण असून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते नक्कीच प्रयत्न करतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.