आशाताई बच्छाव
कांचन डिजिटल यांचे वतीने घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा
रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)- प्रतिवर्षाप्रमाणे यंदा ही कांचन डिजिटल, रत्नागिरी यांचे वतीने रत्नागिरी तालुकास्तरीय घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची घोषणा आज घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत कांचन मालगुंडकर यांनी केली.
या स्पर्धेला श्री निरिपजी को ऑप क्रेडिट सोसायटी म.शाखा रत्नागिरी,व भंडारी युवा प्रतिष्ठान रत्नागिरी यांचे सहकार्य लाभले असून ऑनलाईन स्पर्धेत तालुक्यातील जास्तीत जास्त गणेशभक्तांनी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन कांचन मालगुंडकर यांनी केले. या स्पर्धेचे हे तिसरे वर्ष असून या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात आले नाही. स्पर्धा घेण्याचा एकमेव हेतू हा आहे की, सजावटीमध्ये आपल्या संस्कृतीचे योग्य दर्शन व्हावे आणि स्थानिक कलावंतांना योग्य व्यासपीठ मिळावे यासाठी आपण स्पर्धा आयोजित करत आहोत असे या वेळी कांचन मालगुंडकर यांनी सांगितले.