आंशुराज पाटिल मालेगाव कार्यालय
दिव्यांगाना व त्यांच्या साथीदारास बस प्रवासात मोफत प्रवासाची सवलत द्यावी -संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वयाची पंच्याहत्तरी पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना एसटी बस गाडय़ांमधून मोफत प्रवासाची सुविधा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.याबदल सरकाराचे अभिनंदन पण ज्या दिव्यांगाना चालता येत नाही,जगात काय चालत आहे ते दिसत नाही,जगात काय चालत आहे ते ऐकु येत नाही शासनास आमचे म्हणणे सांगन्यासाठी बोलता येत नाही,अशा दिव्यांगाना व सोबतीला बस प्रवासात मोफत बस पासची सेवा बाबतची घोषणा मुख्यमंत्री साहेबांनी दिव्यांगाना मोफत बस प्रवासाची मोफत सुविधा देऊन ईश्वररूपी दिव्यांगाना शासनाने आधार द्यावा अशी मांगणी दिव्यांग,वृध्द, निराधार मित्र मंडळ महाराष्टृ संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर ,जि अध्यक्ष ज्ञानेश्वर नवले,नागोराव बंडे,राजुभाऊ शेरकुरवार,अनिल रामदिनवार,विठ्ठल बेलकर आदींनी केले.