Home बुलढाणा गायब उपोषणकर्त्यांचा मुलगा व नागरिक पंचायत समिती पोहोचताच बिडिओ व कर्मचारी प्रसार…

गायब उपोषणकर्त्यांचा मुलगा व नागरिक पंचायत समिती पोहोचताच बिडिओ व कर्मचारी प्रसार…

72
0

आशाताई बच्छाव

IMG-20220818-WA0000.jpg

गायब उपोषणकर्त्यांचा मुलगा व नागरिक पंचायत समिती पोहोचताच बिडिओ व कर्मचारी प्रसार…

ज्ञानेश्वर पाटील दांदळे विशेष प्रतिनिधी
(युवा मराठा न्यूज नेटवर्क)

संग्रामपूर पंचायत समिती समोर चालू असलेल्या उपोषणातुन अचानक गायब झालेले वरवट खंडेराव येथील उपोषण कर्ते संतोष गाळकर यांच्या मुलासह नागरिक गट विकास अधिकारी यांच्या दालनात जाब विचारण्यासाठी पोहचताच बि डी ओ कॅबिनमधुन पसार…
१४ ऑगस्ट पासून संग्रामपूर पंचायत समिती कार्यालयासमोर ग्राम वरवट खडेराव येथिल संतोष समाधान गाळकर यांनी उपोषण सुर केले होते.पण अचानक उपोषण कर्ता उपोषणातुन गायब झाल्याने जिल्हाभर खळबळ उडाली आहे…
जबाबदार अधिकाऱ्यांचे मोबाईल बंद येत असल्याने पं.स.प्रशासनावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
संग्रामपूर पंचायत समीतीच्या अधिकाऱ्यांनीच माझ्या वडीलांना पळवुन नेल्याचा उपोषणकर्ते यांचा मुलगा सुपेश गाळकर यांचा आरोप…
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रांत अध्यक्ष प्रशांत डिक्कर हे सुद्धा पंचायत समिती येथे बिडिओ यांच्या कार्यालयात संबंधितांवर कारवाई करा व आमच्या उपोषणकर्त्यास आणून द्या यासाठी बहुसंख्य कार्यकर्त्यांसोबत उपस्थित होते.
विशेष म्हणजे काही दिवसाआधी ग्राम कोद्री येथील नागरिक घरकुल संबंधी पंचायत समिती संग्रामपूर समोर आमरण उपोषणासाठी बसावयास आले असता गटविकास अधिकारी संजय पाटील यांनी उपोषणास बसल्यास कोद्री येथील श्रीराम खोंड यांना माचीस ची काडी लावीन असे त्यावेळी बीडिओ यांनी धमकी दिली होती त्याबाबतचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यावर बिडिओ विरुद्ध पोलीस स्टेशन तासगाव येथे खोंड यांनी फिर्याद सुद्धा दिलेली आहे. परंतु त्यावर पोलिसांनी कुठलीही कार्यवाही आज पर्यंत केली नाही परंतु बिडिओ विरुद्ध खोंड यांनी दिलेल्या फिर्यादीतील साक्षीदार नंदू खांनझोड यांचेवर दबाव आणण्यासाठी बिडिओ यांनी दिलेल्या फिर्याद वर त्याच तामगाव पोलिसांनी मात्र गुन्हा दाखल केलेला आहे हे मात्र विशेष.
आणि त्यानंतर बिडिओ व चार ग्रामसेवक यांच्या कार्यालयीन वेळेत ओल्या पार्टीचा व्हायरल व्हिडिओ अनेक वृत्तपत्रात व टीव्ही चॅनलवर सुद्धा प्रसिद्ध झालेला आहे तरीसुद्धा तालुक्यातील अशा गैर जवाबदार अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याकरिता संबंधित वरिष्ठ अधिकारी व काही लोकप्रतिनिधी सुद्धा तेवढेच जबाबदार तर नाही ना..? कारण त्यांच्या पाठबळामुळेच तर असे प्रकार घडत नाहीत ना अशी शंका सामान्य नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. कारण अशा गुंड प्रवृत्तीच्या दारुड्यांवर वेळीच कारवाई झाली असती तर आज संतोष गाळकर यांना सुद्धा वेळीच न्याय मिळाला असता.
तीन तासांपासून प‌.स.मधे ग्रामस्थ ठाण मांडुन पण अधिकारी गायब…
काही वेळाने गटविकास अधिकारी यांनी उपोषण करते यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने 18 ऑगस्ट सकाळी 11 वाजता बिडिओ समक्ष चौकशी करण्याचा आदेश चार चौकशी अधिकारी नेमुन त्यांना दिला असुन 24 तासाच्या आत आपल्या अभिप्रायासह चौकशी अहवाल सादर करावा असे पत्र बिडिओ यांच्या सहीने काढल्याची माहिती मिळाली.
उपोषणातुन अचानक गायब झालेल्या संतोष गाळकर यांच्यावर अन्याय केलेल्या प.स.विरोधात मुंबई मंत्रालयातील संबंधित विभागाकडे तक्रारी केल्या आणि पावसाळी अधिवेशनात न्याय मिळावा अशी गाळकर कुटुंबाची अपेक्षा…

Previous articleदेगलूर महाविद्यालयात समूह राष्ट्रगीत गायन संपन्न.
Next articleनायगाव येथे आठ हजार विद्यार्थ्यांनी गायले सामूहिक राष्ट्रगीत
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here