आशाताई बच्छाव
पुणे, हवेली तालुका प्रतिनिधी श्री संजय वाघमारे: कासुर्डी दौंड, पुणे या ठिकाणी भारताच्या ७५ व्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिवसाचा कार्यक्रम खूप उत्साहा मध्ये पार पडला. सुरुवातीला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व जय हिंद विद्यालय कासुर्डी या दोन्ही शाळांनी तिरंगा रॅलीची मिरवणूक काढून मंदिरासमोर आले. त्यानंतर जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी देशावर आधारित भाषण केले. त्यानंतर जयहिंद विद्यालय च्या विद्यार्थ्यांनी देशभक्ती गाण्यावर नृत्याचा कार्यक्रम केला व काही विद्यार्थ्यांनी सीमेवरती लढणाऱ्या सैनिकाचा देखावा हुबेहूब सादर करून अंगावर शहारे येईल असे प्रकारे त्यांनी देखावा सादर केला. त्यानंतर देशाच्या स्वातंत्र्याच्या घोषणा देत जोरदार आवाजामध्ये उत्साह साजरा होत होता त्यानंतर गावातील गावकरी मंडळींनी देशावरचे मनोगत व्यक्त केले .अशाप्रकारे कासुर्डी या गावी देशाचा ७५ वा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन खूप उत्साह मध्ये पार पडला. हा कार्यक्रम करत असताना आर्मी मेडिकल कॉलेजच्या वतीने जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना पायातील शूज देऊन त्यांच्याबरोबर आनंद साजरा केला.