आशाताई बच्छाव
तेलंगणाच्या काठावर असलेल्या किनवट तालुक्यातील कोलामगुडा येथे आज घरोघरी तिरंगा चा अभिनव शुभारंभ.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
चारी बाजूने डोंगर आणि जंगलाच्या सानिध्यात असलेले हे छोटे गाव व येथील आदिवासी बांधवांनी, महिलांनी आपले पारंपारिक गीत सादर करून अमृत महोत्सवी वर्षाला अभिवादन केले.
नागुबाई अर्जुन टेकाम यांच्या घरासमोर आज त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी आमदार भीमराव केराम, जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर, सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, तहसीलदार डॉक्टर मृणाल जाधव, गटविकास अधिकारी सुभाष धनवे व गावातील ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी उपस्थित होते.
ध्वजरोहणापूर्वी कोलामगुड्यातील ज्येष्ठ महिला नागुबाई अर्जुन टेकाम लक्ष्मीबाई रामा मडावी भीम बाई राजाराम मडावी नागुबाई लचु टेकाम, लक्ष्मीबाई रामा टेकाम रामबाई लेता मडावी, रामबाई लक्ष्मण आत्राम यांनी भाषेत स्वागत गीत गाऊन या अमृत महोत्सवी वर्षाला शुभेच्छा दिल्या.