आंशुराज पाटिल मालेगाव कार्यालय
वन महोत्सव अंतर्गत विविध ठिकाणी वृक्षारोपण
संदीप गांगुर्डे
पिंगळवाडे युवा मराठा न्युज नेटवर्क सटाणा
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा अंतर्गत व वनविभागाच्या वन मोहत्सवा अंतर्गत विविध शासकीय कार्यालयाच्या आवारात वृक्षरोपणाचा कार्यक्रम संपन्न.
मालेगाव वन विभाग मालेगाव यांचे उपविभागीय अधिकारी जे एन एडलावार यांच्या आदेशान्वये वनपरिक्षेत्र अधिकारी एम आर जोगदंड व वनपरिक्षेत्र ताहराबाद यांचे अधिकारी शिवाजी सहाने यांच्या चांगल्या व उत्कृष्ट मार्गदर्शनाने आज रोजी विविध शासकीय कार्यालयाच्या आवारात वन मोहत्सव साजरा करण्यात आला. प्रथमता प्राथमिक आरोग्य केंद्र ताहाराबाद वैद्यकीय अधिकारी डॉ. संजीवनी क्षिरसागर यांच्या हस्ते वृक्षारोपण झाले.ताहराबाद प्राथमिक आरोग्य केंद्रात साधारण 100 झाडांची लागवड करण्यात आली आहे त्यानंतर मूल्हेर प्राथमिक आरोग्य केंद्रातही वृक्षारोपण वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा बाविस्कर व डॉक्टर भाविका सरोदे यांच्या हस्ते संपन्न झाले.या केंद्रात साधारण शंभर झाडे लावण्यात आली तसेच शासकीय आश्रम शाळा हरणबारी येथेही वृक्षारोपण झाले. या आश्रम शाळेत सरासरी 200 झाडांची लागवड करण्यात आले. या आश्रम शाळेत वृक्षांबद्दल थोडक्यात माहिती शाळेचे मुख्याध्यापक आर. आर. कापडणीस यांनी दिली वन संरक्षण कायदा आणि वनांचे फायदे याविषयी आर एम जोगदंड यांनी विद्यार्थ्यांना प्रबोधन केले. ताहराबाद वनपरिक्षेत्राचे अधिकारी यांनी सांगितले कि ताहराबाद परिसरात शासकीय कार्यालयाच्या पटांगणात कुठेही वृक्षारोपणा साठी आमच्या रोपवाटिकेतून रोपे पुरवण्यास सदैव आम्ही तत्पर आहोत. या कार्यक्रम प्रसंगी वाय एन बहिरम, एस बी पवार, डी बी कापडणीस,ए एफ वसावे,एस एस देवरे, वन परिमंडळ अधिकारी पी आर परदेशी, वी ए दुसाने, तुषार देसाई, संकेत मुंडे, भदाणे, रवींद्र गांगुर्डे, भाऊसाहेब शिंदे, दिलीप अहिरे,सुकलाल गायकवाड, राहुल पाटील, सुरेश बागुल, राजाराम सूर्यवंशी, विजय माळी, शासकीय आश्रम शाळा हरणबारी यांचे शिक्षक शिक्षकेतर व विद्यार्थी तसेच मुल्हेर प्राथमिक आरोग्य केंद्र व ताहाराबाद प्राथमिक आरोग्य केंद्र यांचे व ताहाराबाद वनपरिक्षेत्राचे सर्वच कर्मचारी उपस्थित होते.