Home गडचिरोली गडचिरोली जिल्हातीत ट्रॉमा केअर सह सुसज्ज रुग्णालय उभारण्यास तत्वत: मंजुरी,रुग्णालयासाठी समिती स्थापन...

गडचिरोली जिल्हातीत ट्रॉमा केअर सह सुसज्ज रुग्णालय उभारण्यास तत्वत: मंजुरी,रुग्णालयासाठी समिती स्थापन करण्याचे निर्देश, विमानतळ आणी रेल्वेमार्गाच्या कामाला गती। उपमुख्यमंञी अजीत पवार

71
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220524-WA0034.jpg

गडचिरोली जिल्हातीत ट्रॉमा केअर सह सुसज्ज रुग्णालय उभारण्यास तत्वत: मंजुरी,रुग्णालयासाठी समिती स्थापन करण्याचे निर्देश, विमानतळ आणी रेल्वेमार्गाच्या कामाला गती।
उपमुख्यमंञी अजीत पवार                                                     गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
मागास, आदिवासी आणी नक्षलग्रस्त असलेल्या गडचिरोली जिल्हातील पोलिंसावर तत्वरीत उपचार करता यावेत तसेच स्थानिक आरोग्य सेवेचा दर्जा सुधारावा यासाठी जिल्हात ट्रॉमा केअर सह सुसज्ज असे मल्टिस्पेशालिटी रुग्णालय तयार करण्याच्या मागणीला राज्याचे उपमुख्यमंञी अजीत पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
या रुग्णालयाच्या उभारणीसाठी आर्थिक तरतुद करण्यासोबतच तिथे तज्ञ स्टाफच्या नेमणुकिसाठी जिल्हाअधिकारी संजय मीणा यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्याचे निर्देश उपमुख्यमंञी अजीत पवार यांनी दिला आहे.त्यासोबतच जिल्हात जलद येजा करता यावी तसेच कोनसरी लोहखणीच प्रकल्पाला मदत आणी स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी जिल्हात विमानतळ आणी गडचिरोली- कोनसरी या रेल्वे मार्गाचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश देखील पवार यांनी या बैठकीत दिले.
गडचिरोली जिल्हातील विविध प्रश्नांसंदर्भात आज मंञालयात एक विशिष्ट बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी नगर विकास मंञी तथा गडचिरोली चे पालकमंञी एकनाथ शिंदे,गडचिरोली जिल्हाचे जिल्हाअधिकारी संजय मीणा, पोलिस अधीक्षक अंकित गोयल,अतिरिक्त जिल्हा अधिकारी धनाजी पाटिल,दुरदृष्टाप्रणाली मार्फत उपस्थित होते, तर सार्वजनीक आरोग्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ प्रदिप व्यास,अप्पर मुख्य सचिव नियोजन नितीन गद्रे, प्रधान सचिव नागरी विमान श्रीमती वल्सा नायर,वित्तिय सुधारणा सचिव श्रीमती ए शैलेजा, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक दिपक कपुर,यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते.
पालकमंञी एकनाथ शिंदे यांच्या मागणीला उपमुख्यमंञ्याकडुन सकारात्मक प्रतिसाद
यावेळी पालकमंञी श्री. एकनाथ शिंदे यांनी गडचिरोली जिल्हात होणारे नक्षलवाद्यांचे हल्ले आणी त्यात जखमी होणाऱ्या पोलिसांना तात्काळ उपचार मिळावे यासाठी जिल्हात सर्व सोयींनी युक्त अशा रुग्णालयाची आवश्कता असल्याचे मत वेक्त केले.याठिकाणी लष्कराच्या धर्तीवर दिडशे खाटांचे सामान्य रुग्णालय तयार करावे आणी त्यातील पन्नास खाटा या ट्रॉमा केअर साठी राखीव ठेवाव्यात असे यावेळी निश्चित करण्यात आले.या नव्याने तयार होत असलेल्या रुग्णालय सिटि स्कँन, एमाआरआय यासारख्या अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करुन घ्याव्यात. याठिकाणी नेमणुक करुन देतांना डॉक्टरांना विशेष पॉकेज देवुन तज्ञ स्टाफची नेमणुक करण्यासाठी गडचिरोलीचे जिल्हाधिकार्याच्या अध्यक्षतेखाली समिती नेमुन त्यात मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधीक्षक, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यासह इतर तज्ञ लोकांचा समावेश करावा असे निर्देश यावेळी उपमुख्यमंञ्यानी दिले.

दोन एकर जमिनीवर विमानतळ

गडचिरोली जिल्हातील दळणवळण अधिक गतीमान व्हावे यासाठी जिल्हात सुमारे दोनशे एकर जमिनीवर विमानतळ प्रस्तावित करण्यात आले आहे.यासाठी लागणाऱ्या जमिनीची उपयुक्तता तपासुन घेण्यासाठी ही माहीती विमानतळ प्राधिकरणाकडे पाठवावी असे श्रीमती वल्सा नायर यांनी सांगितले. तर विमानतळ उभारणीसाठी एअरपोर्ट अथॉरिटि कडुन शक्यता ( फिजीबिलीटी) तपासुन घेऊन यासाठी लागणारी तांञीक पाहणीकरण्यासाठी नागपुर येथुन तज्ञ वेक्ती पाठविण्यात येईल असे श्री कपुर म्हणाले.त्यानंतर याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल असे या बैठकीत निश्चित करण्यात आले.

गडचिरोली – वडसा – कोनसरी रेल्वेमार्गाच्या कामासाठी राज्य शासन रेल्वेला संमतीपञ देणार

गडचिरोली जिल्हातील गडचिरोली- वडसा- कोनसरी या रेल्वे मार्गाच्या उभारणीला 2015 साली मंञिमंडळाची मान्यता मिळाली होती.माञ हा प्रकल्प पुढे नेण्यासाठी लागणाऱ्या परवानग्या आणी वित्तीय मान्यता मिळणे अद्याप बाकी होते.हा प्रकल्प कार्यन्वित झाल्यास कोनसरी येथील प्रस्थावित लोहखनिज प्रकल्पाला त्याचा फायदा होईल तसेच स्थानिकांना रोजगार उपलब्ध मिळवुन देणे शक्य होईल त्यामुळे या प्रकल्पाला लवकरात लवकर मंजुरी देण्याची मागणी या बैठकित करण्यात आले.त्यानुसार या प्रकल्पाबाबत रेल्वेला तात्काळ संमतीपञ देऊन त्यानंतर सुधारीत वित्तीय मान्यतेसाठी हा प्रस्ताव मंञिमंडळासमोर आणुन तो संमत करुन घ्यावा असे निर्देश उपमुख्यमंञी अजीत पवार यांनी दिली.

गडचिरोली ते कोनसरी हा 60 किलोमिटर चा रेल्वेमार्ग तयार होऊन गडचिरोली रेल्वेमार्गाने जोडला गेल्यास हा दुर्गम भाग रेल्वेने जोडला जाईल, तसेच या भागात अनेक उद्योजक आकर्षिक होतील आणी रोजगारास चालना मिळेल,नक्षल भागात रोजगार निर्मिती झाल्यास त्याचा फायदा इथला नक्षलवाद कमी होण्यास होईल पण त्याच बरोबर शासनाच्या महसुलातही वाढ होईल.

Previous article१ जून रोजी जिल्ह्यातील ७५ ठिकाणी पीक कर्ज वाटप शिबिराचे आयोजन
Next articleएटापल्ली तालुक्यात नक्षल्यांचे हत्या सञ सुरुच गाव पाटलाची केली हत्या।
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here