Home नांदेड प्रो.डॉ.गंगाधर तोगरे यांचा सेवापूर्ती समारंभ म्हणजे प्रमाणिकपणेे केलेल्या सेवेचा गौरव प्र.कुलगुरू जोगेंद्रसिंह...

प्रो.डॉ.गंगाधर तोगरे यांचा सेवापूर्ती समारंभ म्हणजे प्रमाणिकपणेे केलेल्या सेवेचा गौरव प्र.कुलगुरू जोगेंद्रसिंह बिसेन यांचे प्रतिपादन

77
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220402-WA0064.jpg

प्रो.डॉ.गंगाधर तोगरे यांचा सेवापूर्ती समारंभ म्हणजे प्रमाणिकपणेे केलेल्या सेवेचा गौरव

प्र.कुलगुरू जोगेंद्रसिंह बिसेन यांचे प्रतिपादन

 

नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
—————–
सामाजिक बांधिलकी आणि निस्पृह सेवा आनंददायी असते. प्रोफेसर डॉ.गंगाधर तोगरे यांचा सेवापूर्ती समारंभ म्हणजे त्यांनी आजपर्यंत प्रामाणिकपणे केलेल्या सेवेचा गौरव असल्याचे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडचे प्र.कुलगुरू जोगेंद्रसिंह बिसेन यांनी कंधार येथे बोलताना केले.
श्री शिवाजी कॉलेज कंधार येथील शारीरिक शिक्षण विभागाचे प्रमुख प्रोफेसर डॉ.गंगाधर तोगरे हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवापूर्ती व उत्तुंग गौरवग्रंथ प्रकाशन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव तथा माजी आ. गुरुनाथराव कुरुडे हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्र.कुलगुरू डॉ.जोगेंद्रसिंह बिसेन, विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा.डॉ.दीपक बच्चेवार, क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक विठ्ठलसिंह परिहार, संस्थेचे अध्यक्ष प्रा.डॉ.पुरुषोत्तम धोंडगे, सहसचिव अॅड.मुक्तेश्वर धोंडगे, लोहा येथील संत गाडगेबाबा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक गवते पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष माधवराव पेठकर, चित्राताई लुंगारे, श्री शिवाजी कॉलेज कंधारचे प्राचार्य डॉ.जी.आर.पगडे, व्ही.जी.चव्हाण, प्रा.चित्राताई लुंगारे, प्रा.लिलाताई आंबटवाड, गणेश कुंटेवार, उत्तम चव्हाण आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
संस्थेचे अध्यक्ष प्रा.डॉ.पुरुषोत्तम धोंडगे बोलताना म्हणाले की, डॉ.तोगरे सरांनी हाती घेतलेले काम आजपर्यंत अत्यंत निष्ठापूर्वक केले असून यापुढेही ते निवडलेल्या क्षेत्रात आपला ठसा उमटवतील. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक विठ्ठलसिंह परिहार यांनी तोगरे सरांच्या विविधांगी पैलूंचा उहापोह केला. आणि त्यांच्या कार्य आणि कर्तृत्वाचा गौरव केला. तर व्यवस्थापन समितीचे सदस्य प्रा.डॉ.दीपक बच्चेवार यांनी आपल्या मित्राची सेवापूर्ती म्हणजे जीवनाला आनंदादायी उभारी देणारी बाब असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. याप्रसंगी संस्थेचे सहसचिव मुक्तेश्वर धोंडगे, प्राचार्य जी.आर.पगडे यांनी आपले मनोगत व्यक्त करून प्रा.डॉ.गंगाधर तोगरे यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला. अध्यक्षीय समारोप करताना माजी आ.गुरुनाथराव कुरुडे म्हणाले की, प्रा.डॉ.गंगाधर तोगरे यांनी आजपर्यंत निष्पक्ष, निष्ठेने केलेल्या सेवेचा गौरव असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.
यावेळी महाविद्यालय आणि प्रोफेसर डॉ.गंगाधर तोगरे गौरव ग्रंथ समितीच्या वतीने त्यांचा स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल, पुष्पहार देऊन मान्यवरांचे हस्ते सौ.शारदा तोगरे, आई गुजाबाई तोगरे आदींचा सत्कार करण्यात आला. त्यांनतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ‘उत्तुंग’ गौरव ग्रंथाचे थाटात प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गौरव ग्रंथ समितीच्या अध्यक्षा सौ.अनिता दाणे-जुबांड यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक शिवा कांबळे यांनी केले. तर सचिव बळी अंबुलगेकर यांनी आभार मानले .
यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा तहसीलदार एस.कार्तिकेयन, लोहा येथील तहसीलदार व्यंकटेश मुंडे, बालविकास प्रकल्प अधिकारी चव्हाण, गटविकास अधिकारी एस.एन.मांजरमकर, ता.काँग्रेसचे अध्यक्ष बालाजी पांडागळे, माजी नगरसेवक शहाजी नळगे, राष्ट्रवादी कॉग्रेसचे किसान सभेचे सरचिटणीस मनोहर पा.भोसीकर, शिवसेनेचे ता.प्रमुख परमेश्वर जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष परशुराम केंद्रे, मुख्याध्यापक मनोहर डाकरे, प्राचार्य मोतीभाऊ केंद्रे, संपत शिंगाडे, मारोती घोटरे, विजयकुमार तोगरे, अॅड.राजाराम वाघमारे, अॅड.किशोर क्षिरसागर, अॅड.मारोती पंढरे, अॅड.रवी कांबळे, स्वच्छतादूत राजेश्‍वर कांबळे, प्रल्हाद आगबोटे, माधव जुंबाड, मुख्याध्यापक दिगंबर वाघमारे, माधव भालेराव, जमीर बेग, अॅड.कलीम अन्सारी आदींसह अधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी, व्यापारी आदींची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here