• Home
  • कौठा येथिल साईबाबा मंदिर भूमिपूजन सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न

कौठा येथिल साईबाबा मंदिर भूमिपूजन सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220322-WA0077.jpg

कौठा येथिल साईबाबा मंदिर भूमिपूजन सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न

नायगाव तालुका प्रतिनिधी निळकंठ मोरे पाटील (युवा मराठा न्यूज)

कंधार तालुक्यातील कौठा येथिल साईगडावर आज दि 20 मार्च रोजी संत तुकाराम महाराज बीज अवचित साधून साई मंदिर भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या मंदिर भूमिपूजन सोहळ्यासाठी सर्व संताच्या उपस्थित संत गुरूवर्य श्री देवपूरी महाराज कुरतूडी भुवनेश्वर, श्री दत्तगुरू देवपूरी महाराज काहाळा, शिध्ददयाळ शिवाचार्य महाराज, संतनामसिंह गुरूदयालसिंह बाबाजी गुरुद्वारा नांदेड, जिवनदास महाराज चुडावा,नामदेव महाराज मंठ बारूळ, किशोर महाराज संतोषीमाता मंदिर धर्माबाद याच्या शुभहस्ते साई मंदिर भूमिपूजन सोहळा पार पडला
यावेळी भूमिपूजनास मान्यवर उपस्थित
रा. स. पा. चे महासचिव
मा दोडतले साहेब, माजी आमदार रामभाऊ बुंदीले, लोहा कंधार मतदारसंघाचे नेते आशाताई शामसुंदर शिंदे, रामराव महाराज भाटेगावकर, डाॅ मनिषजी वडजे साहेब, राजकुमार पा. चाकूरकर,
नायगाव मतदारसंघाचे उगवतं नेतृत्व मा.गजानन पाटील चव्हाण, विठ्ठल पाटील गवळी, माधव पा पवळे, दयानंद बसवदे, मारुती गवळी, यांच्यासह सर्व राजकीय सामाजिक शासकीय-निमशासकीय मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते
परिसरातील हजारो सर्व साईभक्त व नागरिकांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला आहे
महाप्रसादाचे योगदान गौतमची जैन धोका,
साई मूर्ती चे योगदान शांतीलाल जैन धोका यांनी अर्पण केली आहे
तसेच कवठा नगरीमध्ये क्रांती सूर्य जगत ज्योती महात्मा बसवेश्वर अण्णा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भूमिपूजन ला सुरुवात करण्यात आली होते
आणी साई मंदिर भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन साई भक्त व्यंकटराव मरिबा घोरपडे मित्र परिवार व कवठा गावकरी मंडळी यांनी केले होते …..

anews Banner

Leave A Comment