
राजेंद्र पाटील राऊत
अकोला (शिवर) येथे मनसे ची शिवजयंती उत्साहात साजरी
अकोला:(सतिश लाहुळकर ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)--दि २१/३/२०२२ रोजी शिवर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तिथी नुसार शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने अकोला संपर्क अध्यक्ष श्री विठ्ठलराव लोखंडकार यांच्या मार्गदर्शनाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी नागरिकांसाठी मोफत रक्तगट तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते.श्रीमंत श्री शिवाजी महाराज ह्यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून सदर शिबिरास सुरवात करण्यात आले.शिवरवासीयांनी शिबिराला प्रचंड गर्दी केली होती.कार्यक्रमाचे नियोजन शुभम कावोकार,गोपाल पाथरकर,निलेश मुरूमकार व गणेश सावरकर ह्यांनी केले होते.
सदर कर्यक्रमास मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे,शहर अध्यक्ष सौरभ भगत,महिला जिल्हाध्यक्ष सौ प्रशंसा अंभेरे,मनविसे जिल्हाध्यक्ष रणजित राठोड,तालुका अध्यक्ष सचिन गव्हाळे, शहर प्रसिद्धी प्रमुख प्रेम पाटील,मनविसे उपजिल्हाध्यक्ष जय मालोकार, ह्यांची प्रमुख उपस्थिती होती.ह्यावेळी शुभम कावोकार(मनसे अकोला उपशहर अध्यक्ष),विजय बोचरे (तालुका सचिव),गोपाल पाथरकर(मनविसे उपशहर अध्यक्ष),ऋषिकेश मुरूमकार(मनसे विभाग अध्यक्ष,शिवर),
मंगेश देशमुख(विभाग उपाध्यक्ष) तथा संतोष म्हातारमरे(शहर संघटक मनकासे) ह्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता चेतन सरोदे, रोहित मानकर,मंगेश देशमूख,ज्ञानेश्वर देशमूख,राज अरबट आदी मनसैनिक ह्यांनी परिश्रम घेतले.