राजेंद्र पाटील राऊत
त्या घटनेच्या निषेधार्थ मोर्चा काढून निषेध
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक, विविध संघटनेचा सहभाग
जिंतूर:(विष्णू डाखुरे तालुकाप्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)- कर्नाटक राज्यातील बेंगलोर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची झालेली विटंबना याच्या निषेधार्तशहरातील विविध संघटनेचा कार्यकर्त्यानी एकत्र येत शहरातील पुतळ्यास दुग्धाभिषेक घालून मोर्चा काढण्यात आला यावेळी समाज कंटकांवर तत्काळ कार्यवाही करण्यासाठी कर्नाटक सरकारवर दबाव अणन्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत दिलेल्या निवेदनात नमूदकरण्यात आले आहे की मागील दोन दिवसांपूर्वी कर्नाटक राज्यातील बेंगलोर येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची शिवद्रोही समाज कंटाकाकडून विटंबना करण्यात आली आहेया घटनेचा आम्ही शिवप्रेमी नागरिक म्हणून जाहीर निषेध व्यक्त करतआहोत.
छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व, चारित्र्य, इतिहास एवढा अद्वितीय आहे की अभ्यासकांना तोंडात बोटे घालायला लावतो आयुष्यातील कोणत्याही संकटाना सामोरे जाण्याची प्रेणा शिवचरित्रातून मिळते मात्र मागील काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास बदनाम करण्याचा सातत्याने प्रयत्न
केला जात आहे कधी कादंबऱ्या, पाठ्यपुस्तके, नाटक तर कधी भाषणातून काही समाज कंटाकडून जाणून बुजून महापुरुषांना बदनाम करण्याचा डाव रचला जात आहे म्हणून जगाच्या इतिहासात शिवरायांशी तुलना होईल असे एकही व्यक्तिमत्व नाही अस असताना एक दोन महिन्याला कोणीतरी समाज विरोधी महापुरुषांची बदनामी करण्याची हिंमत करत आहे अशी हिंमत नीच लोक का करू शकतात परिणामी महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा अपमान करण्यात आला असल्यामुळे शहरातील
विविध संघटनेचा शिवप्रेमी नागरिकांनी एकत्र येत कर्नाटक सरकारचा
निषेध नोंदविण्यात आला यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक करून मोर्चा काढण्यात आला यावेळी मोर्चा तहसील कार्यालयात पोहचताच तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले यावेळी शहरासह तालुक्यातील शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.