Home मराठवाडा शरदचंद्रजी पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त चिकटगाव येथे वृक्षारोपण .

शरदचंद्रजी पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त चिकटगाव येथे वृक्षारोपण .

225
0

राजेंद्र पाटील राऊत

शरदचंद्रजी पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त चिकटगाव येथे वृक्षारोपण .
_________________________

 

औरंगाबाद :ब्युरो चीफ बबनराव निकम: युवा मराठा न्यूज नेटवर्क
_________________________

आज वैजापूर तालुक्यातील चिकटगाव येथे शेतकऱ्यांचे नेते शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त चिकटगाव ग्रामपंचायतीच्या वतीने, उपसरपंच उत्तमराव निकम यांच्या मार्गदर्शनाखाली, कोरोणा सारख्या महाभयंकर रोगाला आवश्यक असलेल्या ऑक्सिजनची गरज लक्षात घेता, ती भागविण्यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून, राष्ट्रवादीचे नेते माननीय आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांच्या शुभ हस्ते पवार साहेबांच्या 81 व्या वाढदिवशी 81 झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला होता. ही झाडे चिकटगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज गार्डन येथे लावण्यात आली. याप्रसंगी शैलेश भैय्या सुराशे, माजी सभापती राजू नाना मगर, सरपंच पती बाळू वाघ, उपसरपंच उत्तमराव निकम, आर के निकम, गणेश निकम, आनंद निकम, पद्माकर निकम ,जगदीश निकम, दिलीप निकम, बाबासाहेब निकम, किरण गायके, रामदास निकम, प्राध्यापक भागवत निकम, संभाजीमगर ,आदींची यावेळी उपस्थिती होती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here