राजेंद्र पाटील राऊत
कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यात राष्ट्रीय युवा मराठा न्यूज, पत्रकार महासंघाचा पेपर प्रकाशन सोहळा संपन्न.
बिदर जिल्हा प्रतिनिधी वसंत पाटील (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
आज कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यात राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार पेपरचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी कर्नाटक राज्य युवा मराठा पत्रकार महासंघ अध्यक्ष श्री यशवंतराव सूर्यवंशी यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांचा सत्कारही यावेळी करण्यात आला. यावेळी बिदर जिल्हा रिपोर्टर तथा राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघ उपाध्यक्ष वसंत पाटील, उत्तर कर्नाटक मराठा युवा सेनाचे अध्यक्ष दत्तू जाधव, श्यामसुंदर पाटील, संदीप पाटील, नारायणराव बिर अकॅडमी चे अध्यक्ष बालाजीराव बिराजदार आदी उपस्थित होते.