Home कोकण जागतिक वारसा सप्ताह चे औचित्य साधून छावा प्रतिष्ठान रत्नागिरी व पुरातत्त्व व...

जागतिक वारसा सप्ताह चे औचित्य साधून छावा प्रतिष्ठान रत्नागिरी व पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय, मुंबई यांच्या अंतर्गत सहाय्यक संचालक, पुरातत्व विभाग, रत्नागिरी महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने थिबा पॅलेस रत्नागिरी येथे स्वच्छता अभियान संपन्न..

230
0

राजेंद्र पाटील राऊत

जागतिक वारसा सप्ताह चे औचित्य साधून छावा प्रतिष्ठान रत्नागिरी व पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय, मुंबई यांच्या अंतर्गत सहाय्यक संचालक, पुरातत्व विभाग, रत्नागिरी महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने थिबा पॅलेस रत्नागिरी येथे स्वच्छता अभियान संपन्न..

रत्नागिरी:(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)- जागतिक वारसा सप्ताह चे औचित्य साधून छावा प्रतिष्ठान रत्नागिरी व पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय, मुंबई यांच्या अंतर्गत सहाय्यक संचालक, पुरातत्व विभाग, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने थिबा पॅलेस रत्नागिरी येथे स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.

याला या मावळमातीतील छावा प्रतिष्ठान रत्नागिरी चे सर्व पदाधिकारी व सदस्य, मित्र परिवार व पर्यटक यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. थिबा पॅलेस रत्नागिरी येथे रविवारी दि.२१ नोव्हेंबर २०२१ रोजी स्वच्छता अभियान संपन्न झाले.

यावेळी छावा प्रतिष्ठान रत्नागिरी कडून उपस्थित मान्यवर यांना पुष्पगुच्छ देवून सन्मानित करण्यात आले. त्यानंतर स्वच्छता अभियानास सुरुवात झाली. या स्वच्छता अभियानामध्ये छावा प्रतिष्ठान रत्नागिरी समवेत १२ पर्यटकांनी सहभाग घेतला होता.

पुरातत्व विभाग, रत्नागिरी, महाराष्ट्र शासन कडून रुची खंदारे मॅडम व शुभम भागवत साहेब व पर्यटक इत्यादी मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या व या स्वच्छता मोहिमेस सहभागी झाले.

हे अभियान यशस्वी करण्यासाठी छावा प्रतिष्ठान चे रत्नागिरी
संस्थापक /अध्यक्ष श्री. सुनिल धावडे, सचिव श्री. समीर धावडे, खजिनदार श्री. गणेश कांबळे, प्रशांत कांबळे, विजय धावडे, मानसी पाथरे, दिप्ती वहाळकर यांनी विशेष मेहनत घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here