राजेंद्र पाटील राऊत
दप्तर दिरंगाई मुळे जिल्ह्यातील ६ हजार शेतकरी कर्जमाफी पासुन वंचित
वंचित ठेवणाऱ्या दोषी अधिकऱ्यांवर गुन्हे दाखल करा*
आमदार डॉ देवरावजी होळी
वंचित शेतकऱ्यांना शासनाच्या प्रसिद्ध यादीनुसार कर्जमाफी देण्यासंदर्भात कारवाई करण्याची मागणी
गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेअंतर्गत कर्ज माफी मध्ये नाव समाविष्ट असूनही दप्तर दिरंगाई व कर्मचाऱ्यांच्या उदासीनतेमुळे गडचिरोली जिल्ह्यातील ६ हजार शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहिल्याने अशा दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करून शासनाने प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केली आहे. पोर्ला येथील शेतकर्यांनी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांना याबाबतचे निवेदन दिले.
महाराष्ट्र सरकारने २०१७ मध्ये छत्रपति शिवाजी महाराज सन्मान योजने अंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केली. त्या मध्ये कर्ज माफी झालेल्या शेतकऱ्यांची नावही जाहीर करण्यात आली. परंतु त्या यादीमध्ये नाव असलेल्या जिल्ह्यातील ६ हजार शेतकऱ्यांना अजुनपर्यंत कर्जमाफी मिळालेकी नाही. त्यामुळे शासनाने त्या लोकांना कर्जमाफी का मिळाली नाही याची चौकशी करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले. ज्यांच्यामुळे शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहिले त्यास जबाबदार असणाऱ्या दोषी कर्मचाऱ्यांवर व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. तसेच वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ कर्ज माफी देण्याचे निर्देश तातडीने प्रशासनाला द्यावेत अशी मागणी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी शासनाला केली आहे