Home नांदेड एनसीबीने गडगा कहाळा रस्त्यावर मांजरम येथे धाडसी कारवाईत ११२७ कीलो गांजा जप्त.

एनसीबीने गडगा कहाळा रस्त्यावर मांजरम येथे धाडसी कारवाईत ११२७ कीलो गांजा जप्त.

204
0

राजेंद्र पाटील राऊत

एनसीबीने गडगा कहाळा रस्त्यावर मांजरम येथे धाडसी कारवाईत ११२७ कीलो गांजा जप्त.
मुखेड प्रतिनिधी/मनोज बिरादार युवा मराठा न्युज नेटवर्क

मुंबई येथील एनसीबी पथकाने मिळालेल्या माहितीनुसार धाडसी कारवाई करत गडगा कहाळा मार्गावर मांजरम येथे गांजा वाहतूक करणाऱ्या ट्रकला पकडल्याची कारवाई १५ नोव्हेंबर रोजी पहाटे पाच वाजता केली.या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणम येथून जळगांवला गांजा जाणार असल्याची माहिती एसीबीच्या पथकास मिळाली त्यानुसार पथकांनी गेल्या काही दिवसांपासून ट्रक क्रमांक एम एच २६एडी २१६५ या वाहनांवर पाळत ठेवली.सदरील ट्रक तेलंगणा बार्डर वरून महाराष्ट्रात प्रवेश केल्यावर त्याचा पाठलाग केला असता सदरील ट्रक नरसी चौकातून गडगा कहाळा मार्गाने नांदेड कडे जात असताना मांजरम गावात ट्रक अडवला व तपासणी केली यात ४३ गोणी त्याचे वजन ११२५ कीलो ग्राम बाजार मुल्य १२ कोटी जवळपास असल्याचे पथकातील अधिकारी सुधाकर शिंदे यांनी सांगितले.कारवाई यशस्वी करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी मोलाचे सहकार्य केले.सरपंच प्रतिनिधी श्रीकांत माली पाटील, पोलिस पाटील जयराज शिंदे, हणमंत शिंदे, इंद्रजित पटवे, बाबुराव पटवे आदींनी सहकार्य केले.या पथकात अमोल मोरे, सुधाकर शिंदे, प्रमोद मोरे, कृष्णा पारमदरेकर यांचा सहभाग होता.

Previous articleसाखर उत्पादनासोबत इथेनॉल,वीज आणि हायड्रोजन उत्पादनाची गरज ; शरदचंद्र पवार
Next articleघेतली तसेच अनेकांनी आर्थिक व वस्तुरुपी देणगी देऊन कार्यक्रम यशस्वी करण्यात हातभार लावला.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here