Home माझं गाव माझं गा-हाणं तळवाडे (भामेर)येथे इंदुबाई गायकवाड यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण

तळवाडे (भामेर)येथे इंदुबाई गायकवाड यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण

117
0

राजेंद्र पाटील राऊत

तळवाडे (भामेर)येथे इंदुबाई गायकवाड यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण
सटाणा, (जगदिश बधान विभागीय प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
बागलाण तालुक्यातील तळवाडे (भामेर) येथिल स्व ग भा इंदुबाई गुलाबराव गायकवाड यांच्या स्मरणार्थ तळवाडे गावात घरांसमोर वृक्षारोपण करण्यात आले.
स्व इंदुबाई गायकवाड यांचे शेवाळी येथील नातू प्रदिप नांद्रे व शेवाळी च्या सरपंच सौ चित्रा प्रदिप नांद्रे यांनी आपल्या आजींच्या स्मरणार्थ वृक्षारोपण साठी आर्थिक सौजन्य दिले. धुळे जिल्हा परिषद सदस्य हर्षवर्धन दहिते ,माजी प.स सदस्य उत्पलतात्या नांद्रे तळवाडे गावाच्या सरपंच सौ गायकवाड,टेंभे येथील मा सरपंच भाऊसाहेब चिला अहिरे,धमनारचे माजी सरपंच दिनेश सोनवणे व तळवाडे गावातील ग्रामस्थांच्या उपस्थितीत प्रत्येक घरापुढे एका वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले. तळवाडे गावातील सर्व तरुण बांधवांनी या वृक्षलागवडी साठी मेहनत घेतली व या पुढिल काळात गावात हे वृक्ष जगवण्याची हमी ही घेतली या प्रसंगी हर्षवर्धन दहिते व भाऊसाहेब अहिरे यांनी मनोगत व्यक्त करताना या उपक्रमाचे कौतुक केले. मान्यवरांचा ग्रामस्थांनी सत्कार केला कार्यक्रमाचे सयोजन हेमंत गायकवाड यांनी केले.
प्रतिक्रिया
आपल्या आजींना मुलगा नसल्याने आजींचे नाव गावावर कायम राहवे यासाठी प्रत्येक घरापुढे वृक्ष लागवड करून कायमस्वरूपी त्यांची व कुटुंबाची आठवण असावी म्हणून हा उपक्रम हाती घेतला.
प्रदीप नांद्रे,शेवाळी

Previous articleताहाराबाद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी जीवाला दौलत माळी यांची बिनविरोध निवड
Next articleकरडखेड येथील माजी सरपंच गंगाधर मलकागौड यांचे अल्पशा आजाराने निधन     
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here