राजेंद्र पाटील राऊत
राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.विजय पवार यांची उल्लेखनीय कामगिरी! वाट चुकलेल्या लहान मुलीला सुखरूप तिच्या परिवाराकडे सोपविले.
ठाणे ( अंकुश पवार,सहसंपादक ठाणे/ युवा मराठा वेब न्युज चॅनल)
आज राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.विजय पवार हे दादर पश्चिम(कबूतर खाना) जवळ वेळ सकाळी ६:३० वाजता कामासाठी गेले असताना त्यांना
एक मुलगी १४ वर्षाची, नाव- कु. तेजू संजय बागुल. ही रडत असताना आणि नजर कावरी-बावरी असताना. ती रस्त्याच्या बाजूला उभी असलेली त्यांना दिसली
श्री. विजय पवार व त्यांचे सहकारी यांची नजर त्या बेसहारा मुलीवर पडली त्या दोघांनी विचार केला मुलगी तर चांगल्या घरातली दिसते. मग ती रडते का व घाबरून का गेली आहे. म्हणून आम्ही दोघांनी तिची चौकशी केली तर ती शनिवारी संध्याकाळी ४:०० वाजल्या पासुन राम नगर टेंबीपाडा भांडुप ( वेस्ट). येथून घरातून निघून गेली होती. श्री.पवार यांनी तिला धीर दिला आम्ही आहोत काळजी करू नकोस.
मग तिच्याकडून घरचा नंबर विचारुन घेतला आणि तिच्या वडिलांना फोन करून आम्ही बोलून घेतले तिचे वडील महानगर पालिकेमध्ये सफाई कामगारांचे काम करतात. त्यांना दादरला येण्यास सांगितले. तुमची मुलगी आमच्या कडे सुखरुप आहे. त्यांना दादरला येण्यासाठी किमान १:०० तास लागला तोपर्यंत आम्ही तिला चहा आणि नाश्ता दिला कारण ती उपाशी होती.
वडील आल्यानंतर आम्ही तिला त्यांच्या स्वाधीन केली आणि घरातून पळून जाण्याचे कारण विचारले तर त्यांनी सांगितले की तिची मानसिक स्थिती ठिक नसल्यामुळे तीला लक्षात राहत नाही.
संजय बागुल यांनी श्री.पवार व सहकारी दत्ता, श्री.मोरे यांचे आणि आमचे यांचे आभार मानले. तुमच्यासारखी चांगली लोक पण अजून आहेत.असे उद्गार त्यांनी आपले अंतकरण भरून काढले.
राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघ पत्रकार,माहिती अधिकार कार्यकर्ते,पोलिस मित्र,यांची राज्यव्यापी संघटन शक्ती आहेच,सोबतच सोबतच माणुसकीची, व समाजकार्यामध्ये आघाडीवर असल्याचे व सदैव युवा मराठा पत्रकार महासंघ असल्याचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री विजय पवार यांनी सिद्ध केले आहे.