Home मुंबई कोरोनाच्या काळात आर्थिक कोंडी असताना, रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांची लूट सुरू…!

कोरोनाच्या काळात आर्थिक कोंडी असताना, रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांची लूट सुरू…!

141
0

राजेंद्र पाटील राऊत

कोरोनाच्या काळात आर्थिक कोंडी असताना, रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांची लूट सुरू…!

ठाणे (अंकुश पवार,सहसंपादक ठाणे/युवा मराठा वेब न्युज चॅनल)

गेल्या वर्षभरापासून जगात हाहाकार माजविला आलेल्या करोना महामारी ने राज्यातील जनतेला सर्वच बाजूने अडचणीत आणलेले आहे. त्यात आर्थिक नुकसान अनेक लोकांचे झाले आहे.

अनेक लोकांचे कामधंदे गेले आहेत, राज्याची अर्थव्यवस्था देखील बिघडलेली दिसून येते. आता कुठे वर्षभराने सर्व सुरळीत सुरू होतं आहे. तोच रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांची लूट केली जाते आहे.

रेल्वे स्थानकात प्रवाशांना सरकारी ओळखपत्र,हॉस्पिटल, फार्मसिस्ट कंपनीच्या ओळखपत्र यांवर लोकल ट्रेन चे तिकीट दिले जात नाही आहे, तसेच दोन डोस झालेल्या नागरिकांना युनिव्हर्सल पास असून देखील लोकल तिकीट न देता संपूर्ण महिन्याचा पास दिला जात आहे.

स्त्रिया,जवळचे लोक यांना प्रवास करायचं असेल तर ३० रुपयाच्या तिकीट साठे गरज नसताना महिन्याभराचा पास घेण्याची सक्ती रेल्वे प्रशासनाकडून का केली जात आहे.
रेल्वे प्रशासनाकडून सामान्य जनतेची लूट केली जात आहे,यावर कोणत्याही राजकीय पक्षाला काहीच माहिती नाही का? या गोष्टीचा विचार करण्याची वेळ आली आहे.

दिवाळीचा सण आहे,लोक लोकल ट्रेन ने खरेदीसाठी भुलेश्वर,csmt,मुंबई ला खरेदीला जातात असे असताना रेल्वे प्रशासनाकडून लोकल तिकीट न देता संपूर्ण महिन्याचा पास दिला जातो आहे,हे कोणत्या नियमानुसार करत आहेत,याचा खुलासा रेल्वे प्रशासनाकडून केला जावा,सर्व सामान्य जनतेची लाइफ लाईन म्हणून समजल्या जाणाऱ्या लोकल ट्रेन च्या या मनमानी कारभारात सरकार,राजकीय पक्षांनी लक्ष दिले पाहिजे. युवा मराठा वेब न्युज चॅनल/पेपर च्या वतीने रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांची लूट का आणि कोणत्या अधिकाराने नियमाअन्वये केले जात आहे याचा खुलासा रेल्वे प्रशासनाकडून करावा ही विनंती राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here