राजेंद्र पाटील राऊत
उमरी तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे कागदी घोडे न नाचवता तात्काळ सरकारने मदत करावी –
युवा जिल्हाउपाध्यक्ष मराठा मावळा संघटना-कैलास पाटील कदम भायेगावकर.
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
उमरी तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून काही भागात ढगफुटी दृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे
गोदाकाटच्या सर्व गावात मोठे नुकसान नुकसान झाले आहे भायेगाव राहाटी मनुर बोळसा इज्जगाव बरेच गावाचा आजुन पण संपर्क तुटुन आहे त्यामुळे नागरीकाना खुप ञास होत आहे भायेगाव येथील हळद सोयाबीन कापून ज्वारी तुर मुग ऊस मिरची फुले आधी शेती सर्व प्रकारच्या पिका या अतिवृष्टीमुळे उध्वस्त झाले आहे शेतकऱ्यांच्या हाताला आलेले पीक अक्षरशा भुईसपाट झालेली आहे संपूर्ण तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात परतिची अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे नदीकाठावरील तसेच नाल्याच्या काठावरील असलेल्या जमिनी चे पीक अक्षरशा खरडून जाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तरीही प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन लवकरात लवकर पंचनामे न करता कागदी घोडे न नाचवता शेतकऱ्यांना लवकरात लवकर शासनानी एकरी 50 हजार रुपयांची मदत करावी. बळीराज्याला सहकार्य करावी अशी विनंती.. युवा जिल्हाउपाध्या मराठा मावळा संघटना. कैलास पाटील कदम भायेगावकर
यांनी केली आहे.