Home विदर्भ पशू वैद्यकिय दवाखाना मेडशी श्रेणी-1 येथे घटसर्प व फऱ्या आजावरील प्रतिबंध लसीचे...

पशू वैद्यकिय दवाखाना मेडशी श्रेणी-1 येथे घटसर्प व फऱ्या आजावरील प्रतिबंध लसीचे लसीकरण सुरू                       

192
0

राजेंद्र पाटील राऊत

पशू वैद्यकिय दवाखाना मेडशी श्रेणी-1 येथे घटसर्प व फऱ्या आजावरील प्रतिबंध लसीचे लसीकरण सुरू                                                                                                              मालेगाव,(प्रकाश भुरे जैन तालुका प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क विदर्भ)

मालेगाव तालुक्यात सर्वात जास्त पशू धन असलेल्या मेडशी परिसरातील पशू पालकांना शासनाच्या वतीने पावसाळी पूर्वी जनावरा वरील फाऱ्या व घटसर्प आजाराचे नियोजन म्हणून प्रतिबंधनात्मक लसीचे लसीकरण मोहीम राबविली जात आहे.परिसरातील पशू पालकाने लवकरात लवकर लसीकरण करून घ्या जेणे करून सदर गंभीर आजारचे लागण होऊन जनावर दगावणार किंवा दुःखी रोगी होणार नाही .पावसाळ्यात जनावरे आजारी पडण्याचे व त्यामुळे होणाऱ्या मरतुकीचे प्रमाण सर्वाधिक असते. जनावरांना रोगाचा प्रादुर्भाव झाल्यावर उपचार करण्यापेक्षा या रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून अधिक काळजी घेणे अधिक हितकारक ठरते.अतिवृष्टीमुळे वातावरणातील ओलावा, सूर्यप्रकाशाचा अभाव, ढगाळ वातावरण गोठ्यातील ओलावा चारापाण्याची ढासळलेली प्रत या एकूणच परिस्थितीमुळे जनावरांच्या शरीर प्रक्रियेवर ताण पडतो.जनावरांमध्ये आजारांचे प्रमाण किंवा साथीचे रोग जसे घटसर्प, फऱ्या इत्यादी उद्‌भवतात. अशा वेळी शक्‍य असल्यास आंबवणाचे प्रमाण वाढवून द्यावे. प्रामुख्याने दुभत्या आणि व्यायला झालेल्या गाई, म्हशींची अन्नघटकांची शारीरिक मागणी पूर्ण करण्याकरिता आंबवण्याचे प्रमाण वाढवणे आवश्‍यक आहे.फऱ्या रोगाची लक्षणे म्हणजे एकाकी ताप येतो, मागचा पाय लंगडतो. मांसल भागाला सूज येते. सूज दाबल्यास चरचर आवाज येतो. या रोगासाठी प्रतिबंधक करण्यासाठी दरवर्षी सुरवातीला जनावरांना लसीकरण करून घ्यावे व घटसर्प या रोगात जनावर एकाएकी आजारी पडते. खाणे पिणे बंद होते. अंगात ताप भरतो. गळ्याला सूज येऊन डोळे खोल जातात. घशाची घरघर सुरू होते. या रोगासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे दरवर्षी पावसाळ्यापूर्वी निरोगी जनावरांना लसीकरण करण्यात येते आहे.या प्रसंगी उपस्थीत डॉ एस एस गोरे प्रभारी पशुधन विकास अधिकारी श्री एम बी सोनारगण पट्टीबंधक, श्री एस के पवार परिचर, श्री ए के वैद्य परिचर ह्यांच्या सह विशाल सरकटे, सोहेल पठाण, व पशुमालक अजिंक्य मेडशीकर यांची उपस्थिती होती

Previous articleमुंबईत २२ हजार कोटींचा SRA घोटाळा – ईडी’कडून ओमकार रियल्टर्सचे गुप्ता आणि वर्मा अटकेत
Next articleशहरी व ग्रामीण भागात दमदार पावसाची हजेरी..! पिकांना जीवनदान तर शेती कामाला येणार वेग
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here