जाहुर परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा. सलग पंधरा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर समाधानकारक पाऊस.
मुखेड तालुका प्रतिनिधी युवा मराठा न्यूज मनोज बिरादार
जाहूर परीसरात मागील पंधरा दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्याने बळीराजा चिंतातुर झाला होता. खरीप हंगामातील पिकांना समाधानकारक पाऊस पडल्याने जणू जीवदानच मिळाले असून जाहूर सह उंद्री (प.दे),राजुरा (बु,)भाटापुर,आंबुलगा,बिल्लाळी,लिंगापूर,ठाणा,औराळ,लोणाळ, चोंडी,तुपदाळ आदी गावातील शेतकरी मोठ्या व संततधार पावसाच्या प्रतिक्षेत होते. त्यातच वरुणराजाने कृपा केल्याने शेतकरी सुखावला आहे..परीसरात पेरणी पूर्णपणे झालेलीअसून गोगलगाईंचा उपद्रव फार मोठ्या प्रमाणात झाला होता त्या अंकुर खाऊन फस्त करीत होते.बहुतांशी शेतकऱ्यांनी सोयाबीन,उडीद,मुग,कापूस,तूर या पिकाची पेरणी केली असून पंधरा दिवसाच्या प्रतिक्षेनंतर समाधानकारक पाऊस बरसल्याने बळीराजा सुखावला आहे.
Home Breaking News जाहुर परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा. सलग पंधरा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर समाधानकारक पाऊस.