Home माझं गाव माझं गा-हाणं रानबाजीरे आदिवासीवाडी येथील महिलांसाठी सॅनिटरी पॅड वाटप उपक्रम 🛑

रानबाजीरे आदिवासीवाडी येथील महिलांसाठी सॅनिटरी पॅड वाटप उपक्रम 🛑

217

राजेंद्र पाटील राऊत

🛑 रानबाजीरे आदिवासीवाडी येथील महिलांसाठी सॅनिटरी पॅड वाटप उपक्रम 🛑
✍️ रायगड 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

रायगड:⭕दिनांक ११/०५/२१ रोजी सद्गुरु सेवा प्रतिष्ठान, पुणे आणि धैर्य सामाजिक संस्था, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने पोलादपूर तालुक्यातील रानबाजीरे आदिवासी वाडी येथील सर्व आदिवासी महिलांसाठी मोफत सॅनिटरी पॅड वाटप उपक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमासाठी स्वदेस फाउंडेशन च्या आरोग्य विभाग कर्मचारी जूलेखा शेख, स्वदेस मित्र विमल सावंत, धैर्य सामाजिक संस्था अध्यक्ष ओंकार उतेकर उपस्थित होते. मासिक पाळी च्या दिवसांत स्वच्छता तसेच सॅनिटरी पॅड चा वापर आणि योग्य विल्हेवाट याबाबत जूलेखा शेख यांनी महिलांचे मार्गदर्शन केले.

विमल सावंत यांनी सर्व महिलांना एका ठिकाणी जमवून सामाजिक अंतराचे पालन करण्यास आणि सॅनिटरी पॅड वाटप करण्यास मदत केली. या उपक्रमाचा एकूण ४५ आदिवासी कुमारीका आणि महिलांना लाभ मिळाला. या उपक्रमासाठी सद्गुरु सेवा प्रतिष्ठान, पुणे चे अध्यक्ष श्री सचिन म्हसे यांनी पुढाकार घेऊन रानबाजीरे गावातील आदिवासी महिलांसाठी देणगी स्वरूपात मदत केली. ⭕

Previous articleदुर्गंधी पसरवणाऱ्या कंपन्यांना हद्दपार करू-संदिप फडकले यांचा इशारा 🛑
Next articleआपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत नायगांवचे सामाजिक कार्यकर्ते पांचाळ यांनी जपली सामाजिक बांधिलकी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.