राजेंद्र पाटील राऊत
प्रतिनिधी.. प्रवीण अहिरराव
नाशिक.. गोवा येथून नाशिकला विक्रीसाठी आणण्यात येणारा तब्बल एक कोटी रुपयांचा मद्यसाठा नाशिक उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक मनोहर अंचुळे यांच्या पथकाने सापळा रचून पकडला. येवला टोल नाक्यावर खबऱ्या मार्फत मिळालेल्या
माहितीनुसार मी कारवाई करण्यात आली. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सिरॅमिकच्या भांड्याच्या गाडीत चोर कप्पा बनवून ही वाहतूक केली जात होती.
कोरोना काळात मोठ्या प्रमाणात दारू येथून तेथे अवैध पद्धतीने नेण्याचा प्रकार सुरू आहे. पण, राज्य उत्पादक शुल्क विभागाने कारवाई केल्यामुळे अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.