राजेंद्र पाटील राऊत
आमदार बोरसेंनी रुग्णांसाठी दिली संजीवनी….१० ऑक्सिजन मशीन ग्रामीण रुग्णालयाला भेट.. डांगसौंदाणे- (नारायण भोये विभागीय संपादक युवा मराठा न्युज नेटवर्क) बुंधाटे ग्रामपंचायत, आमदार दिलीप बोरसे व खासदार डॉ सुभाष भामरे यांच्या सहकार्याने विलगीकरण केंद्र आज सुरू करण्यात आले.. आरोग्य विभागाकडून करण्यात आलेल्या तपासणीत डांगसौंदाणे- बुंधाटे गावात पेशंट मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. तसेच डांगसौंदाणे ग्रामीण रुग्णालयात अतिरिक्त भार पडत असल्याने ..कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या नविन सूचनेनुसार पॉजिटीव्ह पेशन्ट चे विलगीकरण घरात न करता हॉस्टेल, शाळा येथे स्वतंत्र व्यवस्था करून करण्यात यावे…बागलाण तालुक्यासह जिल्ह्यात ही मोहीम राबविण्यात येत आहे. डांगसौंदाणे- बुंधाटे ग्रामपंचायतिने संयुक्तपणे लोकसहभागाने व आमदार श्री दिलीप बोरसे, खासदार डॉ सुभाष भामरे यांच्या प्रयत्नातून …आगामी काळात पेशन्ट वाढीचा वेग लक्षात घेऊन तातडीच्या उपाययोजना म्हणून आज बुंधाटे उपसरपंच नंदू महाराज बैरागी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माजी सभापती संजय सोनवणे, जेष्ठ पत्रकार हेमंतदादा चंद्रात्रे, उपसरपंच सुशील सोनवणे, माजी उपसरपंच विजय सोनवणे,माजी उपसरपंच कैलास बोरसे,जाणता राजा मंडळाचे अध्यक्ष सोपान सोनवणे, निवृत्त मुख्याध्यापक पंढरीनाथ बोरसे, पंकज भदान, ग्रामसेवक श्री सचिन सूर्यवंशी, भूषण भदाणे, पत्रकार निलेश गौतम,पत्रकार हिरालाल बाविस्कर, भावसा साबळे, राम गायकवाड, सरपंच निर्मला साबळे, सरपंच जिजाबाई,रवींद्र सोनवणे, राहुल खैरनार, ग्रामसेवक श्री सूर्यवंशी, श्री आंबेकर, ग्रामपंचायत कर्मचारी पोलीस पाटील,आदिवासी वसतिगृहाचे गृहपाल श्री एम डी भोये, आरोग्य विभागाच्या ए एन एम आहेर, ठाकरे, पोलीस स्टाफ आदींच्या उपस्थितीत नियोजित विलगीकरण सेंटर सुरू करण्यात आले . लोकसहभाग असल्याने ज्यांना विलगीकरण केंद्रात दाखल व्हायचे असेल त्यांनी ग्रामपंचायतिशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे