राजेंद्र पाटील राऊत
🛑 वृत्तपत्र विक्रेत्यांनी जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून घेतली कोविड-१९ लस 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )
मुंबई :⭕जनमानसात कोरोनामुळे अनेक समज – गैरसमज होत असतांना, विश्वासार्ह माहीती उपलब्ध करून देणारे वृत्तपत्र विक्रेत्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता घरोघरी पोहचविण्याची आपली महत्वाची भुमिका पार पाडली. त्यामुळे अनेक गैरसमज दुर झाले व सरकारची ध्येय धोरणे सर्वसामान्य लोकापर्यंत पोहोचली. संपूर्ण कोविड काळात स्वत:ला व वर्तमानपत्राला सुरक्षित ठेऊन विक्रेत्यांनी आपला व्यवसाय सामाजिक भान ठवूनच केला.
वर्तमानपत्र घेऊन वाचण्यात कोणताही धोका नाही, हे जागतीक आरोग्य संघटनेने जाहिर केलेले आहे.
सरकारच्या वतीने देण्यात येणारी कोविड १९ लस सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांनी घेऊन स्वत:स सुरक्षित करावे असे आवाहन संघटने मार्फत करण्यात आले आहे.
यासाठी बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने संजय चौकेकर, भालचंद्र पाटे,शंकर रिंगे,प्रदिप सातार्डेकर,रामदास सावर्डेकर,अविष्कार पवार,बाळकृष्ण चव्हाण,प्रसाद भोसले यांच्यासह अनेक वृत्तपत्र विक्रेत्यांना नायर रुग्णालयात आज कोविड १९ लसीकरण करण्यात आले.
यावेळी संघटनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.या सामाजिक उपक्रमाला नायर रुग्णालयातील डिन डॉ. रमेश भारमल व सहाय्यक डिन, नोडल ऑफिसर covid-19 डॉ. सारीका पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले.
बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाच्या वतीने संजय चौकेकर व जीवन भोसले यांनी त्यांचे शतशः आभार मानले.⭕