Home नांदेड नायगाव तालुक्यातील ताकबिड घरगुती गॅस चा स्फोट होऊन तीन घरे जळून खाक....

नायगाव तालुक्यातील ताकबिड घरगुती गॅस चा स्फोट होऊन तीन घरे जळून खाक. गावकऱ्यांच्या सतर्कतेने पुढील अनर्थ टळला

236
0

राजेंद्र पाटील राऊत

नायगाव तालुक्यातील ताकबिड घरगुती गॅस चा स्फोट होऊन तीन घरे जळून खाक. गावकऱ्यांच्या सतर्कतेने पुढील अनर्थ टळला
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
नायगाव तालुक्यातील मौजे ताकबीड येथे दिनांक 28 मार्च रोजी सकाळी 11 च्या सुमारास अचानक घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन तीन घरास लागलेल्या आगीत संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. याच अंदाजे दहा लाखाचे नुकसान झाल्याचे समजते. अचानक लागलेल्या आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले. यात संभाजी किशन मंडलापुरे, हनमंत इरबा मंडलापुरे, राधाबाई किशन मंडलापुरे या तिनी भावांचे आगीमुळे कौलारू घरासह गहू तांदूळ ज्वारी डाळी आदीसह घरातील भांडे कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने हरभरा पाच क्विंटल फ्रीज कूलर लॅपटॉप शासकीय कागदपत्रे व अन्य संसारोपयोगी जळून खाक झाल्याने मंडलापुरे कुटुंब आर्थिक अडचणीत सापडले आहे.ताकबिड चे सरपंच शिवराज पाटील यांनी तात्काळ नगरपंचायत अग्निशामक दलाला माहिती दिल्यामुळे नगरपंचायत अग्निशामक दलाने अथक परिश्रम घेऊन ही आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला. गावातील ग्रामस्थांनी आपापल्या घरातील पाणी आणून आग विझवण्यासाठी अथक परिश्रम घेतले आणि ही आग आटोक्यात येऊन पुढील अनर्थ टळला. अन्यथा गावातील इतर घरास ही आग पेट घेऊन पूर्ण गाव आगीत जळून खाक झालेले असते सदरील माहिती नायगाव येथील तहसील कार्यालय सह वरिष्ठांना कळवले त्यांनी तात्काळ घटनास्थळाला भेट देऊन घटनेचा रीतसर पंचनामा केला. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसल्याची माहिती ताकबिड चे सरपंच शिवराज पाटील यांनी दिली आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या या कुटुंबास प्रशासनाने तात्काळ मदत जाहीर करून सहकार्य करावे अशी मागणी होत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here