राजेंद्र पाटील राऊत
पेठ वडगांव शहरात विवीध ठिकाणी शिवजंयती उत्साहाने साजरी
पेठ वडगांव : आज १९ फेब्रुवारी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती संपूर्ण वडगांव शहरात व परिसरात शासनाच्या नियमाच्या नियमाचे पालण करून उत्साहाने साजरी करण्यात आली.
त्यानिमित वडगांव शहरातील हनुमान तरुण मंडळाने छत्रपती शिवाजी महाराज जयंती हनुमान मंदीरासमोर उत्साहाने , साध्यापद्धतीने साजरी करण्यात केली.
महाराजांच्या प्रतिमेचे पूजन भारतीय मराठा महासंघाचे कोल्हापूर जिल्हाअध्यक्ष श्री.मोहन शिंदे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून पुष्पहारअर्पण करण्यात आले.
यावेळी मंडळाचे संदीप पाटील , जयदीप पाटील , विशाल खामकर ,संग्राम पाटील , शिवतेज पाटील , राजू पेटकर , शौर्य पाटील , हर्षवर्धन पाटील ,वरद पाटील ,राणोजी पाटील इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.(युवा मराठा न्युज नेटवर्क कोल्हापूर)