Home पश्चिम महाराष्ट्र वयाच्या २१ व्या वर्षी कु.स्नेहल काळभोर सरपंच पदी निवड

वयाच्या २१ व्या वर्षी कु.स्नेहल काळभोर सरपंच पदी निवड

114
0

राजेंद्र पाटील राऊत

वयाच्या २१ व्या वर्षी कु.स्नेहल काळभोर सरपंच पदी निवड

सातारा : खडकी तालुका दौंड येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कु.स्नेहल संजय काळभोरची निवड झाली आहे. वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी कु.स्नेहल बिनविरोध सरपंचपदी निवडून आली. त्यानंतर तिची खडकी गावातून घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली.
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील सर्वात कमी वयाची सदस्य म्हणून कु.स्नेहल काळभोर खडकी ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी पहिल्यांदा निवडून आली होती. आता तिच्या गळ्यात सरपंचपदाची माळ पडल्याने सर्वात तरुण सरपंच होण्याचा मान कु.स्नेहल काळभोरला मिळाला आहे.
स्नेहल संजय काळभोर ही एमसीए च्या दुसऱ्या वर्षाचं शिक्षण घेत आहे. काल झालेल्या सरपंच-उपसरपंचपदाच्या निवडणुकीत कु.स्नेहलची सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर सरपंच-उपसरपंचांची गावातून घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली. आपल्या शिक्षणाचा गावाच्या विकासासाठी वापर करुन अधिकाधिक कामे मार्गी लावण्याचा मानस स्नेहल काळभोर हिने व्यक्त केला आहे.

युवा मराठा न्युज नेटवर्क .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here