Home नांदेड नांदेड जिल्ह्यातील खरीप हंगाम सन 2020- 21 साठी तुर खरेदी मार्केटिंग फेडरेशन...

नांदेड जिल्ह्यातील खरीप हंगाम सन 2020- 21 साठी तुर खरेदी मार्केटिंग फेडरेशन मार्फत ऑनलाईन शेतकरी नोंदणी सुरू..

220

राजेंद्र पाटील राऊत

नांदेड जिल्ह्यातील खरीप हंगाम सन 2020- 21 साठी तुर खरेदी मार्केटिंग फेडरेशन मार्फत ऑनलाईन शेतकरी नोंदणी सुरू..

मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
नांदेड दिनांक 28 डिसेंबर 2020 जिल्ह्यातील किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत हंगाम 2020 21 साठी हमीभावाने तुर खरेदी करण्यासाठी मार्केटिंग फेडरेशन मार्फत ऑनलाईन शेतकरी नोंदणी आजपासून सुरू करण्यात आलेली आहे. शेतकर्‍यांनी खरेदी केंद्रावर जाऊन आपली नोंदणी करावी असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी सुधीर पाटील यांनी केली आहे. जिल्ह्यातील खरीप हंगाम 2020 21 साठी नांदेड (अर्धापूर) मुखेड हदगाव किनवट बिलोली (कासराळी) देगलूर कंधार व लोहा मार्केटिंग फेडरेशन मार्फत ऑनलाईन शेतकरी नोंदणी आज पासून सुरू करण्यात आली आहे. या खरीप हंगामात तुरीचा हमीभाव प्रतिक्विंटल सहा हजार रुपये आहे. नांदेड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी चालू हंगामातील तुर या पिकाचा ऑनलाईन पीक पेरा नोंद असलेला सातबाराचा उतारा आधार कार्ड व राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक प्र त आदी कागदपत्रे तालुक्यातील खरेदी केंद्रावर देऊन शेतकऱ्यांनी नोंदणी करावी असे आवाहन पण अधिकारी सुधीर पाटील यांनी केले आहे.

Previous articleकाळाचौकी येथे श्रद्धा हाऊसिंग सोसायटी तर्फे भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धे संपन्न झाली 🛑
Next articleपुरोगामी पत्रकार संघाच्या युवक संघर्ष समिती महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रशांत कोठावदे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.