राजेंद्र पाटील राऊत
*…विशेष लेख!*
*आपण सांभाळुया नातेसबंध*
*नातेवाईक खेळून जातील गेम*
वाचकहो,
आजकाल चांगल्या पध्दतीने बघायला गेले तर या भुतलावरील माणूस नावाचा प्राणी स्वार्थाने व मतलबाने किती आंधळा झालेला आहे याचे दर्शन घडते.आपण आयुष्यभर ज्या नातेवाईकांची हुजूरेगिरी करायची,त्यांच्या पुढे पुढे करायचे अखेर एके दिवशी तेच नातेवाईक आपल्या सर्वनाशाला कारणीभूत ठरतात.व कुटील डावपेच रचून आपल्याला आयुष्यातून उठविण्याचे षडयंत्र रचतात.तरीदेखील आम्ही मग त्याच त्या नातेवाईकांचे कोडकौतुक व उदोउदो कोणत्या नाकाने करायचा? कालपर्यत आम्ही प्रचंड दुःखात होतो,संकटात होतो अडचणीत होतो.त्यावेळी हे नावाला नातेवाईक असलेले सगळेच जण ढुंगणाला पाय लावून पसार झाले व आमच्याच विरुध्द कुटील कारवाया करीत फिरले.हि वस्तुस्थिती कोणीही नाकारु शकत नाही.
तरीही कालपर्यत ज्या नातेवाईकांना आमचा बाट लागत होता.त्याच नातेवाईकांच्या मांडीला मांडी लावून बसणे हे कोणत्या नितीधर्मात बसते? आपण फक्त नाते सांभाळायचे अन नातेवाईकांनी येऊन गेम खेळून निघून जायचे,हा धुर्त कावेबाज कपटीपणा आम्ही काय फक्त बघतच बसायचा का? त्यासाठी आम्हांलाच स्वतः च्या मनाची चाड आणि चीड निर्माण झाली पाहिजे.नाही तर नावाला नातेवाईक सांगणारे आमची नेहमीच चारचौघात इज्जत काढत राहतील अन आम्ही त्यांना सन्मानाची वागणूक द्यायची हे म्हणजे लाचारासारखेच जीवन झाले.ज्या लोकांनी आमच्या दुःखाच्या अडचणीच्या काळी पाठ फिरविली तेच लोक आज आमचे थोडसे सुख बघून आमच्या मागेपुढे फिरत आहेत.मग हे कसले नातेवाईक ? हे तर संधीसाधू भाडखाऊ प्रवृतीचे हपापलेली भामटी हडवाळ..! कालपर्यत आमचा ज्यांना बाट लागला.आमचा तिटकारा निर्माण झाला.आमच्याविषयी घृणा व व्देष होता,तेच आज आमच्याबाबत चांगले कसे झाले?त्यांना नातेवाईक असल्याचा अचानक पुळका कसा सुटला? श्रीकृष्णासारखे प्रेम दाखवून स्तनपान करायला गेलेली पुतना मावशी किती कपटी व पाताळयंत्री होती हे तर आपण बघितलेच आहे.त्याचप्रमाणे अध्यात ना मध्यात अचानकपणे कधीतरीच नातेवाईक म्हणून मिरविणारे भयानक घातक व षडयंत्री मनोवृतीचे असतात, हे येणारा काळच त्यांचे खरे रुप दाखवतो.त्यामुळे पुर्वापार लोक म्हणतच आलेत की,सारे गाव मामाचे अन एक नाही कामाचे…! हिच खरी वस्तुस्थिती आम्ही कधी स्विकारणार? हाच खरा प्रश्न आहे! एवढेच… राजेंद्र पाटील राऊत मुख्य संपादक युवा मराठा