राजेंद्र पाटील राऊत
वैद्यकीय क्षेत्रातील १५ हजार डॉक्टर्स व स्टाफचे पहिल्या टप्प्यात covid-१९ साठी लसीकरण ; मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार
विशेष प्रतिनिधी – राजेश एन भांगे
बीड,दि.९ – जिल्ह्यातील शासकीय व खाजगी वैद्यकीय क्षेत्रातील १५ हजार कार्यरत डॉक्टर आणि स्टाफ च्या पहिल्या टप्प्यातील कोरोना बाबत लसीकरणासाठी डब्ल्यू.एच.ओ च्या मार्गदर्शक निर्देशांकानुसार राष्ट्रीय प्रणालीवरील कार्यवाहीसाठी माहिती तातडीने पूर्ण करावी असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी केले.
कोरोना (Covid-19 )लसीकरण बाबत जिल्हा कृती समितीची बैठक आज मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीला जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यू एच ओ) चे समन्वयक वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल गायकवाड, (आय एम ए) चे उपाध्यक्ष डॉ. अनुराग पांगारकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार, जिल्हा शल्य चिकित्सक सूर्यकांत गीते, पोलीस निरीक्षक हेमंत मानकर , जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यासह स्वराती वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय आरोग्य विभागातील अधिकारी आणि विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कुंभार म्हणाले जिल्ह्यात वैद्यकीय सेवेतील अधिकारी-कर्मचारी तसेच खाजगी वैद्यकीय व्यावसायिक आणि त्यांच्याकडील स्टाफ यांच्या कोरोना लसीकरणाबाबत पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आहे या अनुषंगाने डब्ल्यू एच ओ चा तत्वानुसार सर्व संबंधित यांना सुचित करण्यात आले असून त्यांची माहिती राष्ट्रीय पोर्टल वर अद्ययावत केली जात आहे.
लसीकरण प्रक्रिया चा भाग म्हणून यासारखे आवश्यक असणारे वैद्यकीय आणि सहाय्यकारी व्यक्तींच्या प्रशिक्षणाची दिनांक निहाय वेळापत्रक राष्ट्रीय स्तरावरून निश्चित करण्यात आले असून त्याप्रमाणे जिल्ह्यातील कार्यवाही होणे गरजेचे आहे.
18 डिसेंबरपर्यंत याबाबतची प्रशिक्षण आणि नियोजन पूर्ण केले जाणार असून त्यानंतर राष्ट्रीय पोर्टल वरून निश्चित होणार्या जिल्ह्यातील दिनांक व दिवशी प्रत्यक्षात वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींचे लसीकरण केले जाईल.
यासाठी जिल्हास्तरीय टास्क फोर्स बरोबरच तालुका स्तरावर देखील कृती समिती स्थापन करणे, लसीकरण काळात उद्भवणाऱ्या परिस्थितीसाठी तात्काळ प्रतिसाद देणारे वैद्यकीय तज्ञांचे समिती स्थापन करणे याच बरोबर लसीकरण तज्ञ लसीकरणाची ठिकाणे आणि पोलीस, शिक्षक व अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी आधी इतर सहाय्यकारी कर्मचारी यांची नियुक्ती व प्रशिक्षणे पूर्ण करणे याबाबत सूचना देण्यात आल्या.